आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - येत्या २३ मार्चपासून तुर्कस्तानचे मल्ल पुण्यामध्ये कुस्तीचा अाखाडा गाजवणार अाहेत. या ठिकाणी तीनदिवसीय महापाैर चषक अांतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे अायाेजन करण्यात अाले. अाता तुर्कीच्या मल्लांचा सहभाग स्पर्धेतील चुुरस वाढवणार अाहे.
तुर्कस्तानमध्ये मातीवरची कुस्ती खेळणारे पाच मल्ल भारतीय मल्लांशी लढणार आहेत. या लढती चुरशीच्या आणि रंगतदार होणार याची खात्री कुस्तीप्रेमींना वाटत आहे. तब्बल ६० लाख रुपयांची पारितोषिके या स्पर्धेत प्रदान केली जाणार आहेत. पुणे महापालिका व भारतीय कुस्ती संघ, महराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघ यांच्या मान्यतेने ‘पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा’ थरार २३ ते २५ मार्चदरम्यान कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयात रंगणार आहे, आयोजक माजी स्थायी समिती अध्यक्ष, मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली.
सुशील कुमार, गीता फाेगटची उपस्थिती : स्पर्धेच्या निमित्ताने महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार छत्रपती संभाजीराजे, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, एमआयटीचे संस्थापक प्रा. विश्वनाथ कराड, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, आयुक्त कुणाल कुमार, हिंद केसरी गणपतराव आंदळकर, रुस्तुम-ए-हिंद पै. दादू चौगुले, हिंद केसरी दीनानाथ सिंग, ऑलिम्पिक विजेता सुशील कुमार व आशियाई पदक विजेती गीता फोगट आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ट्रिपल महाराष्ट्र केसरीही स्पर्धेत झुंजणार
हिंदकेसरी योगेश दोडके म्हणाले की, या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदुस्तानी व तुर्कस्तानी मल्लांदरम्यान कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. ईयुप ओरमान, गुऱ्ह्न बलकल, मेटीन टेमिझेक, अहमत सलबस्ट, इस्माईल इरकल हे आंतरराष्ट्रीय मल्ल या वेळी भारतीय मल्लाशी दोन हात करणार आहेत. यांच्या समोर हिंदकेसरी साबा, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत, राष्ट्रीय खेळाडू माउली, मुन्ना झुंझुरके यांचे आव्हान राहणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.