Home | Sports | Other Sports | Colombia team in Knockout

काेलंबिया नाॅकअाऊटमध्ये दाखल; पराभवानंतरही जपान पुढच्या फेरीत

वृत्तसंस्था | Update - Jun 29, 2018, 05:43 AM IST

जागतिक क्रमवारीत १६ व्या स्थानावर काेलंबिया संघाने राेमहर्षक विजयाच्या बळावर फिफाच्या २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्

 • Colombia team in Knockout

  समारा/वाेल्गाेगाद्र- जागतिक क्रमवारीत १६ व्या स्थानावर काेलंबिया संघाने राेमहर्षक विजयाच्या बळावर फिफाच्या २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या नाॅकअाऊटमधील प्रवेश निश्चित केला. या संघाने गुरुवारी एच गटातील अापल्या शेवटच्या सामन्यात सेनेगलवर मात केली. येरी मीनाच्या (७४ वा मि.) गाेलच्या बळावर काेलंबियाने सामन्यात सेनेगलचा पराभव केला. काेलंबियाने १-० अशा फरकाने सामना जिंकला. यासह काेलंबियाला पुढच्या फेरीतील अापला प्रवेश निश्चित करता अाला.


  दुसरीकडे जपानच्या टीमला पराभवानंतरही स्पर्धेच्या अंतिम १६ मधील प्रवेश निश्चित करता अाला. जागतिक क्रमवारीत अाठव्या स्थानावर असलेल्या पाेलंड संघाने गटातील तिसऱ्या सामन्यात जपानवर मात केली.


  समाराच्या मैदानावर सेनेगलच्या खेळाडूंनी विजयासाठी शर्थीची झंुज दिली. मात्र या टीमला शेवटच्या मिनिटांपर्यंत गाेल करता अाला नाही. त्यामुळे टीमला पराभवाचा सामना करावा लागला. तसेच टीमला खेळाडूंच्याही गैरवर्तनाचा फटका बसला. यातून सेनेगलचे पुढची फेरी गाठण्याचा प्रयत्न अपुरा ठरला.


  पाेलंडचा पहिला विजय; जपान अंतिम १६ मध्ये
  जागतिक क्रमवारीत अाठव्या स्थानावरील पाेलंडने स्पर्धेत पहिला विजय नाेंदवला. या संघाने गटातील तिसऱ्या सामन्यात गुरुवारी जपानचा पराभव केला. बेडनारेकने (५९ वा मि.) सामन्यात फिल्ड गाेल केला. या गाेलच्या बळावर पाेलंड संघाने १-० अशा फरकाने सामना जिंकला. तरीही पाेलंडच्या टीमला पुढची फेरी गाठता अाली नाही. या टीमचा तीन सामन्यात हा पहिलाच विजय ठरला. अाता ३ गुणांसह पाेलंडला मायदेशी परतावे लागेल.

Trending