आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIFA World Cup: गतविजेता बलाढ्य जर्मनीचा संघ ८० वर्षांनी पहिल्याच फेरीत बाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कझान/एकोतेरिनबर्ग- गतविजेत्या जर्मनीला द. कोरियाने हरवले आणि  या बलाढ्य संघाचे वर्ल्डकपमधील आव्हान संपले. २०१४मध्ये स्पेन व २०१० मध्ये इटलीनंतर विश्वजेता संघ पहिल्या फेरीतच बाद होण्याची ही सलग तिसरी वेळ. तर, विश्वविजेता संघ पहिल्याच फेरीत बाद होण्याची एकूण सहावी वेळ. इटलीने दोन वेळा हा अनुभव घेतला. बुधवारी  द. कोरियाने जर्मनीला २-० ने हरवले. दुसऱ्या सामन्यात स्वीडनने मेक्सिकोला ३-० ने मात दिली. स्वीडन, मेक्सिको उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले. १९३८ नंतर ८० वर्षांनी जर्मनी पहिल्याच फेरीत बाद झाला. स्वीडनने १२ वर्षांनंतर बाद फेरीत प्रवेश केला.


एकमेकांशी संबंधित होते एफ गटातील हे दोन फुटबॉल सामने
जर्मनी ३ गुणांसह गटात दुसऱ्या स्थानी होता. स्वीडनचेही इतकेच गुण होते. मात्र फेअर प्ले गुण कमी असल्याने स्वीडन तिसऱ्या स्थानी होता. म्हणजे जर्मनीला प्री क्वार्टरसाठी द. कोरियाला त्याच फरकाने हरवायचे होते, ज्या फरकाने स्वीडन, मेक्सिकोशी जिंकले होते. असे झाल्यास तो टॉप-२ राहिला असता.


पहिला हाफ स्वीडन- मेक्सिको अाणि जर्मनी-कोरिया ०-० ने बराेबरीत हाेते. म्हणजे जर्मनीचा पुढच्या फेरीत प्रवेश निश्चित हाेता.


दुसऱ्या हाफमध्ये मात्र असे बदलले चित्र
- 50 वा मिनिट स्वीडनने मेक्सिकोवर पहिला गाेल केला. 
- 62 वा मिनिट स्वीडनचा दुसरा गाेल. नंतर जर्मनीने गोरेत्जाच्या जागी म्युलरला पाठविले. 
- 74 वा मिनिट  स्वीडनची 3-0 अाघाडी. 4 मिनिटांनी जर्मनीने हेक्टरच्या जागी ब्रँड्टला पाठवले.
- 90 वा मिनिट जर्मनीचे सर्व 11 खेळाडू कोरियन हाफमध्ये हाेते.
- 92वा मिनिट कोरियाच्या संघाने सामन्यातील पहिला गाेल केला. चार मिनिटांनी दुसरा करत जर्मनीवर पहिला विजय मिळवला.


वर्ल्डकप स्पर्धेत अाशियातील संघाकडून प्रथमच जर्मनी पराभूत
-अाशियातील एखाद्या संघाने जर्मनीला हरवण्याची वर्ल्डकपमध्ये ही पहिलीच वेळ. यापूर्वी अाशियाई संघांसाेबत झालेले पाचही सामने जर्मनीने जिंकले.
-३२ वर्षांनंतर जर्मनी पहिल्या फेरीतील ३ मॅचमध्ये  हाफ टाइममध्ये अाघाडी घेऊ शकली नाही.
- सहा वेळा अजिंक्यपद पटकावणारी टीम वर्ल्ड कपच्या इतिहासात प्रथमच पहिल्या फेरीतच अाऊट.
- ६० वर्षांनंतर स्वीडनने पहिल्या फेरीतील सामना ३-० ने जिंकला. यापूर्वी १९५८ मध्ये मेक्सिकाेला त्यांनी याच पद्धतीने पराभूत केले हाेते.

 

बातम्या आणखी आहेत...