आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने हिरावले अाता पाकिस्तानचे यजमानपद, यूएईत अाशिया कप सप्टेंबरमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आशिया कप क्रिकेट स्पर्धा भारत-पाकिस्तान या देशांमध्ये होण्यापेक्षा क्रिकेटच्या विकसनशील देशात व्हावी हा बीसीसीआयचा दृष्टिकोन एशियन क्रिकेट कौन्सिलच्या क्वालालंपूर (मलेशिया) येथील कार्यकारिणीच्या बैठकीत अधोरेखित झाला. एशियन क्रिकेट कौन्सिलने २०१८च्या एशिया कप क्रिकेट स्पर्धेचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) करण्याचा निर्णय घेतला. ५०-५० षटकांच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची ही स्पर्धा यंदा १३ ते २८ सप्टेंबर (२०१८) या कालावधीत यूएईमध्ये होईल.  


या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि एशिया कप पात्रता स्पर्धेचा विजेता संघ असे सहा संघ सहभागी होतील. याआधी एशिया कप स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय कौन्सिलने घेतला.  


मात्र अबुधाबी व दुबई येथील महत्त्वाच्या सामन्याचे यजमानपद जसे भारताला मिळणार तसेच नवोदित संघांचे सामने पाकिस्तानात आयोजित करण्याची संधी पाकिस्तानलाही मिळणार आहे.
त्याशिवाय स्पर्धेचा महत्त्वाचा भाग श्रीलंकेच्या यजमानपदाखाली आयोजित केला जाईल. स्पर्धेचा कार्यक्रम लवकरच निश्चित होणार आहे

बातम्या आणखी आहेत...