आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजयासह जपानने रचला इतिहास: दक्षिण अमेरिकेतील टीमला पराभूत करणारा अाशियातील पहिला संघ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सारांस्क- जागतिक क्रमवारीत ६१ व्या स्थानावर असलेल्या जपान संघाने मंगळवारी फिफाच्या २१व्या  विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत एेतिहासिक विजयाची नाेंद केली. जपानने एच गटातील अापल्या पहिल्याच सामन्यात जागतिक क्रमवारीत १६ व्या स्थानावर असलेल्या काेलंबियाचा पराभव केला. जपानने २-१ अशा फरकाने राेमहर्षक विजय संपादन केला. यासह दक्षिण अमेरिकेच्या टीमचा पराभव करणारा जपान हा अाशियातील पहिला संघ ठरला. शिंजी कगावा (६ वा मि.) अाणि युया अाेसाकाे (७३ वा मि.) यांनी गाेल करून जपानला विक्रमी विजय मिळवून दिला. काेलंबियासाठी जुअान क्विंटेराेने (३९ वा मि.) गाेल केला. मात्र, काेलंबियाचा हा सामन्यातील एकमेव गाेल ठरला. अाता जपानचा स्पर्धेतील दुसरा सामना २४ जुन राेजी सेनेगलशी हाेईल. दुसरीकडे काेलंबियाच्या टीमला पाेलंडच्या अाव्हानाचा सामना करावा लागेल. हे दाेन्ही संघ रविवारी समाेरासमाेर असतील. 


सांचेझला रेड कार्ड; शिंजीचा गाेल
काेलंबियाने सहज पकड घेतली हाेती. मात्र,  सांजेझने केलेल्या गैरवर्तनाचा काेलंबियाला माेठा फटका बसला.त्यामुळे त्याला तिसऱ्याच मिनिटाला रेड कार्ड मिळाले. त्यानंतर जपानला पेनाल्टीची संधी मिळाली. याच संधीला सार्थकी लावताना शिंजीने सहाव्या मिनिटाला सामन्यात गाेलचे खाते उघडले. 


११ वा मिनिट, काेलंबिया अपयशी
पिछाडीवर पडल्यानंतर काेलंबियाला अवघ्या पाच मिनिटांत बराेबरीची संधी मिळाली हाेती. मात्र, या टीमला गाेल करता अाला नाही. ११ व्या मिनिटाला काेलंबियाच्या कर्णधार रडामेल फाल्काअाेने फ्री किक मारली. मात्र, जपानच्या गाेलरक्षक एइजी कवाशीमाने चेंडू राेखला अाणि काेलंबियाचा बराेबरीचा प्रयत्न हाणुन पाडला. त्यानंतर कर्णधार फाल्काअाेने ३९ व्या मिनिटाला गाेल करून काेलंबियाला बराेबरी मिळवून दिली.

बातम्या आणखी आहेत...