आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या टेनिस स्टार्सची अागेकूच; नदाल, दिमित्राेवचे राेमहर्षक विजय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी- नंबर वन राफेल नदाल, तिसऱ्या मानांकित ग्रिगाेर दिमित्राेव, सहाव्या मानांकित मरीन सिलीचने अापला दबदबा कायम ठेवताना सत्रातील पहिल्या ग्रँडस्लॅम अाॅस्ट्रेलियन अाेपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. भारताच्या युवा िदविज शरण, बाेपन्नानेही सरस खेळी करताना स्पर्धेतील अाव्हान कायम ठेवले. त्यामुळे त्यांना अापापल्या गटात अागेकूच करता अाली. दुसरीकडे फ्रान्सच्या ज्याे विल्फ्रेड त्साेंगाचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. त्यामुळे त्याला झटपट स्पर्धेतून अापला गाशा गुंडाळावा लागला.   


सहाव्या मानांकित मरीन सिलीचने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत राेमहर्षक विजयाची नाेंद केली. त्याने लढतीमध्ये अमेरिकेच्या रेयाॅन हॅरिसनचा पराभव केला. त्याने ७-६, ६-३, ७-६ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याला अंतिम १६ मधील अापला प्रवेश निश्चित करता अाला. या विजयासाठी त्याला तिन्ही सेटवर शर्थीची झुंज द्यावी लागली. मात्र, सरस खेळी करताना त्याने हा सामना जिंकला.   


तिसऱ्या मानांकित ग्रिगाेर दिमित्राेवने विजय संपादन केला. त्याने  ३० व्या मानांकित रुबलेवचा पराभव केला. त्याने ६-३, ४-६, ६-४, ६-४  ने सामना जिंकला. यासह त्याला प्री-क्वार्टर फायनलमधील प्रवेश निश्चित करता अाला.      


किर्गियाेसची त्साेंगावर मात

पुरुष एकेरीच्या लढतीत १७ व्या मानांकित निक किर्गियाेसने सनसनाटी विजय संपादन केला. त्याने सामन्यात १५ व्या मानांकित त्साेंगाचा पराभव केला. त्याने ७-६, ४-६, ७-६, ७-६ अशा फरकाने विजयश्री खेचून अाणली. यासाठी त्याला चांगलीच झुंज द्यावी लागली.  


अाेस्तापेंकाेचे पॅकअप

फ्रेंच अाेपन चॅम्पियन जेलेना अाेस्तापेंकाेचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. तिला महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत एनेट काेंटावेटने पराभूत केले. एनेटने ६-३, १-६, ६-३ अशा फरकाने सामना जिंकला. तिचा हा सनसनाटी विजय ठरला. 

 

राेहन बाेपन्ना-राॅजर विजयी 
भारताच्या राेहन बाेपन्नाने पुरुष दुहेरीत अापला सहकारी राॅजरसाेबत विजय मिळवला. या दहाव्या मानांकित जाेडीने अंतिम ३२ च्या सामन्यात साेऊसा-मेयरवर मात केली. त्यांनी ६-२, ७-६ ने एकतर्फी विजयांची नाेंद केली. यामुळे त्यांचा अंतिम १६ मधील प्रवेश निश्चित झाला. 

 

दिविज-राजीव प्री-क्वार्टर फायनलमध्ये 

भारताचा युवा टेनिसस्टार िदविज शरणने अापला सहकारी राजीव रामसाेबत पुरुष दुहेरीची उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यांनी लढतीत ग्रानाेलर्स-फाेगनिनिवर ४-६, ७-६, ६-२ ने मात केली.

 

नदालची अागेकूच

अव्वल मानांकित राफेल नदालने पुरुष एकेरीत शानदार विजय संपादन केला. त्याने लढतीमध्ये बाेस्नियाच्या दामिर ड्झुमहुरचा पराभव केला. त्याने ६-१, ६-३, ६-१ अशा फरकाने विजय नाेंदवला. यासह ताे अंतिम १६ मध्ये दाखल झाला. पुरुष एकेरीच्या किताबाचा प्रबळ दावेदार म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्याची अातापर्यंतची अागेकूचही सरस उल्लेखनीय ठरली. यासह त्याने अापला दावाही मजबूत केला.

बातम्या आणखी आहेत...