आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

36 वर्षीय राॅजर फेडरर सर्वात वयस्कर नंबर वन टेनिस स्टार; राफेल नदालवर कुरघाेडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राॅटरडम- स्विसकिंग राॅजर फेडरर अाता पुन्हा एकदा टेनिसच्या विश्वात जगातील नंबर वनचा खेळाडू झाला अाहे. त्याने राॅटरडम अाेपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या प्रवेशास फेडररने माजी नंबर वन राफेल नदालवर कुरघाेडी केली अाणि नंबर वनच्या सिंहासनावर विराजमान झाला. त्यामुळे अाता ३६ वर्षीय फेडरर हा सर्वात वयस्कर नंबर वन टेनिस स्टार ठरला अाहे. यादरम्यान त्याने अमेरिकेच्या अांद्रे अागासीचा विक्रमही ब्रेक केला. अागासीने २००३ मध्ये ३३ वर्ष १३१ व्या दिवसांच्या वयात नंबर वनचे स्थान गाठले हाेते.

 

> ३ ग्रँडस्लॅम जिंकले अापल्या शेवटच्या पाच ग्रँडस्लॅम किताबामध्ये  

> ९६ ९६ किताब जिंकले रॉजर फेडररने अापल्या २० वर्षांच्या करिअरमध्ये  

 

> ७४० कोटी रुपये बक्षिसातून जिंकले आहे फेडररने आतापर्यंत. सर्वाधिक.

> ८२ % विजयाचे रेकॉर्ड अापल्या करिअरमध्ये. सध्याचे सर्वाधिक 

 

 पढील स्‍लाइडवर पाहा, आंद्रे अगासी 33 तर राफेल नदाल ३१ व्या वर्षी बनले होते नंबर-१... 

 

बातम्या आणखी आहेत...