आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पॅनिश फुटबॉल लीग; राेनाल्डाेचे हॅट्ट्रिकचे अर्धशतक; 21 गाेलसह यंदा टाॅप स्काेअरर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माद्रिद- रियल माद्रिदच्या सुपरस्टार फुटबाॅलपटू क्रिस्टियानाे राेनाल्डाेने रविवारी रात्री गाेलची ५० वी हॅट््ट्रिक केली. त्याने स्पॅनिश फुटबाॅल लीगमध्ये गिराेनाविरुद्ध सामन्यातून हे हॅट््ट्रिकचे अर्धशतक पूर्ण केले. त्याने या सामन्यात शानदार गाेलची हॅट््ट्रिक नाेंदवली. त्याने सामन्यात ११, ४७, ६४ व्या मिनिटांसह अतिरिक्त वेेळेेत (९१ वा मि.) गाेल केले. या गाेलच्या बळावर रियल माद्रिदने सामन्यात गिराेनावर ६-३ अशा फरकाने शानदार विजय संपादन केला. या विजयासह रियल माद्रिदने लीगच्या गुणतालिकेमध्ये तिसऱ्या स्थानावर धडक मारली.

 

दुसरीकडे राेनाल्डाेने यंदाच्या सत्रामध्ये (२०१८) सर्वाधिक गाेलची अापल्या नावे नाेंद केली. अाता त्याचे सत्रातील १३ सामन्यांत एकूण २१ गाेल झाले अाहेत. यासह अाता २०१८ च्या सत्रात टाॅप स्काेअरर बनला अाहे.   


 माद्रिदच्या विजयात राेनाल्डाेचे याेगदान माेलाचे ठरले. तसेच लुकास वेजववेज (५९ वा मि.) अाणि गारेथ बेलने (८६ वा मि.) यांनीही प्रत्येकी एक गाेल केला. गिराेनाकडून क्रिस्टियन स्टुअानी (२९, ६७  वा मि.) अाणि जुनापेने (८८ वा मि.) यांनी गाेल केले.   बार्सिलाेनाची बिलबाअाेवर मात : बार्सिलाेनाने स्पॅनिश लीगमध्ये शानदार विजय संपादन केला. या क्लबने सामन्यात अॅथलेटिकाे बिलबाअाेवर २-० अशा फरकाने मात केली. 

 

सर्वाधिक ३४ हॅट््ट्रिक ला लीगामध्ये  

पाेर्तुगालच्या क्रिस्टियानाे राेनाल्डाेने ५० पैकी ३४ हॅट््ट्रिकची नाेंद ला लीगामध्ये केली अाहे. हे सर्वाधिक वेळा ठरले. यामध्ये मेसी २७ हॅट््ट्रिकसह दुसऱ्या स्थानावर अाहे. राेनाल्डाेने ७ हॅट््ट्रिक चॅम्पियन्स लीगमध्ये, ४ वर्ल्डकप क्वालिफाइंगमध्ये २ काेपा डेल रेमध्ये, ईपीएल-क्लब वर्ल्डकप-युराेपियन चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येकी एकदा हॅट््ट्रिक केली. पाेर्तुगाल टीमकडून ५ वेळा अाणि मँचेस्टर युनायटेडकडून एकदा हॅट््ट्रिक केली.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा,  २०१८ चे टॉप स्कोअरर... 

बातम्या आणखी आहेत...