आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेर्तुगालच्या विजयासाठी अाज राेनाल्डाे उतरणार मैदानावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माॅस्काे- जागतिक क्रमवारीत चाैथ्या स्थानावर असलेल्या पाेर्तुगाल संघाला २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत विजय मिळवून देण्यासाठी सुपरस्टार क्रिस्टियानाे राेनाल्डाे मैदानावर उतरणार अाहे. पाेर्तुगालचा बी गटातील दुसरा सामना बुधवारी माेरक्काे संघाशी हाेईल. या सामन्यात पाेर्तुगालच्या टीमला माेठ्या फरकाने विजयाची संधी अाहे. 

 

गत सामन्यात राेनाल्डाेच्या अव्वल कामगिरीने पाेर्तुगालच्या टीमला पराभव टाळता अाला. या टीमने रंगतदार सामन्यात माजी चॅम्पियन स्पेनला बराेबरीत राेखले हाेते. राेनाल्डाेने गाेलची हॅट्ट्रिक नाेंदवून हा सामना ३-३ ने बराेबरीत ठेवला. अाता पाेर्तुगाल संघ अापल्या गटात विजयाचे खाते उघडण्यासाठी सज्ज झाला अाहे. यातील विजयाने पाेर्तुगालला गुणतालिकेत अाघाडी घेता येईल.  दुसरीकडे माेरक्काेला सलामीच्या सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले हाेेते.

बातम्या आणखी आहेत...