आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • A Feature On The Family Life Of Indian Hockey Star Rani Rampal | Asia Cup

मजुराची मुलगी अशी बनली हॉकी टीमची कॅप्टन; एका रात्रीत झाली स्टार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - भारतीय महिला हॉकी टीमने 13 वर्षांनंतर पुन्हा हॉकी आशिया कप काबिज केले आहे. या टीमचे नेतृत्व हरियाणातील शाहाबाद येथे राहणाऱ्या राणी रामपालने केले. एका रात्रीत ती स्टार बनली असे म्हटल्यास चुकीचे ठरेल. कारण येथे पोहोचण्यासाठी राणी रामपाल आणि तिच्या कुटुंबियांनी कित्येक वर्षे कष्ट घेतले आहे. यश शिखरावर असलेल्या राणीने आपल्या वडिलांच्या योगदानाला कधीच विसरणार नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी घोडागाडी चालवून आपल्या मुलीला इथपर्यंत नेले आहे. राणीच्या यशाने आज तिचेच नव्हे, तर तिच्या कुटुंबियांचे नशीब देखील बदलले आहे. 
 
असे आहे राणीचे कुटुंब...
- 5 वर्षांपूर्वी राणीचे अख्खे कुटुंब घोडागाडीवर होणाऱ्या उत्पन्नावर विसंबून होते. तिच्या वडीलांनी घोडागाडी चालवूनच तिला रिओ डी जेनेरिओ पर्यंत पाठवले. 
- गरीबीत वाढलेली राणी आजही आपले वडील मजुरी करतात हे म्हणायला लाजत नाही. तिला आपल्या वडिलांवर आणि ते करत असलेल्या कामावर अभिमान वाटतो. 
- आपल्या वडिलांनी जे काही केले तेच लक्षात ठेवून राणीने आपल्या नावात राणी रामपाल (तिच्या वडिलांचे नाव) असे केले. 

खेळण्यासाठी किट तर सोडाच, शूजही नव्हते...
> लहानपणापासूनच तिला हॉकी खेळण्याचा छंद होता. मात्र, त्यासाठी लागणारे किट किंवा शूज तिच्याकडे नव्हते. द्रोणाचार्य पुरस्कृत कोच बलदेव सिंग यांनीच तिला प्रशिक्षण आणि लागणारे साहित्य दिले. 
> 13 वर्षांची होती, तेव्हापासून वडील रोज तिला हॉकी कोचिंग सेंटरवर सोडत होते. 
> जर्मनीत खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय वुमन्स हॉकी टीमने तिसरे पदक मिळवले. राणी त्यामध्ये प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरली होती. 
> ऑलिम्पिक क्वालिफायर टूर्नामेंटमध्ये सुद्धा राणीच्या बळावर टीम इंडियाला 36 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळाली. 
> तिला रेल्वेत क्लार्क म्हणून नोकरी मिळाली आहे. टीमसह ती कुटुंबियांना देखील वेळ देते. तिची हॉकी खेळण्याची टेकनीक सर्वात वेगळी आहे. तिने गोलसाठी हॉकीने फेकलेला चेंडू कुणीच अडवू शकत नाही. 
> 2009 मध्ये चॅम्पियन चॅलेन्ज टूर्नामेंटमध्ये तिने भारतासाठी 4 गोल केले होते. सध्या ती भारतीय वुमन हॉकी संघाची टॉप स्कोरर आहे. 2010 मध्ये तिने हॉकी वर्ल्ड कपमध्ये सहभाग घेतला, त्यावेळी तिचे वय केवळ 15 वर्षे होते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, तिच्या गाव आणि कुटुंबाचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...