आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसोटी क्रमवारी : डिव्हिलर्स अव्वलस्थानी पोहोचला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - वनडे क्रिकेटचा नंबर वन फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या एल्बी डिव्हिलर्सने आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत नंबर वनचे सिंहासन पटकावले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या स्टिवन स्मिथला मागे टाकले. कसोटी गोलंदाजांत डेल स्टेन पहिल्या क्रमांकावर आहे.
आयसीसीने कसोटी खेळाडूंची यादी जाहीर केली. अॅशेस मालिकेच्या पहिल्या कसोटीत मने जिंकणारा इंग्लंडचा फलंदाज रुट करिअरचे सर्वोत्तम स्थान मिळवताना चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. द. आफ्रिकेचा हाशिम आमला तिसऱ्या तर श्रीलंकेचा कुमार संगकारा पाचव्या व अँग्लो मॅथ्यूज सहाव्या क्रमांकावर आहे. यानंतर पाकिस्तानचा युनूस खान सातव्या स्थानी आहे. गोलंदाजीत अॅशेसच्या पहिल्या कसोटीत दमदार प्रदर्शन करणारा इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
बातम्या आणखी आहेत...