आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनवचा डबल धमाका; आयोनिकाला कांस्यपदक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारताचा अव्वल नेमबाज अभिनव बिंद्राने आशियाई एअर गन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाचा डबल धमाका उडवला. तसेच आयोनिका पॉलने कांस्यपदक पटकावले. अभिनवने स्पर्धेत वैयक्तिक आणि सांघिक गटात सुवर्णपदकाचा वेध घेतला.
बीजिंग ऑलिम्पिक चॅम्पियन बिंद्राने १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताला पदके मिळवून दिली. कर्णी सिंग शूटिंग रेंजवर बिंद्राने फायनलमध्ये २०८.८ गुणांची कमाई केली. युरकोवने रौप्यपदक पटकावले. गगन नारंगने चौथे स्थान गाठले. यूथ गटात आशी रस्तोगीला सुवर्ण : भारताच्या आशी रस्तोगीने यूथ गटात सुवर्णपदक पटकावले. तिने २०५.७ गुणांसह हे सोनेरी यश आपल्या नावे केले. याच गटात प्राची गडकरीने कांस्यपदकावर नाव कोरले.

आयोनिका पॉलला कांस्य
भारताची युवा महिला नेमबाज आयोनिका पॉलने सोमवारी आशियाई एअर गन नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये पदकाची कमाई केली. तिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक पटकावले. आयोनिकाने १८५ गुण संपादन करतान तिसरे स्थान गाठले. या गटात सिंगापूरच्या जेसमीन वेईने सुवर्णपदकावर नाव कोरले. तसेच इराणची एलाहेह अहमदीने रौप्यपदक पटकावले.