आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: प्रो कबड्डीमध्ये अभिषेकसह ऐश्वर्याची मस्ती, वसुंधरांनीही घेतला कबड्डीचा आनंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रो कबड्डी मॅच दरम्यान अभिषेक आणि ऐश्वर्या. - Divya Marathi
प्रो कबड्डी मॅच दरम्यान अभिषेक आणि ऐश्वर्या.
जयपूर- प्रो कबड्डीमध्ये गत चॅम्पियन जयपूर पिंक पैंथर्सला सलग तीसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचा पटना पायरेट्सने 29-23 या फरकाने पराभव केला. या रोमांचक सामन्यात आपल्या टीमचा उत्साह वाढवण्यासाठी टीमचे ओनर अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या आले होते. जयपुर येथे झालेल्या या सामन्यात राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेही उपस्थित होत्या.
2014 मध्ये चॅम्पियन असलेल्या जयपूर पिंक पैंथर्ससाठी हे वर्ष निराशाजनक राहिले आहे. त्यांनी आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले आणि या तीनही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. याबरोबरच ते गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहेत. आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले बच्चन कपलदेखील यामुळे निराशच दिसून आले.
अभिषेकने केले ऐश्वर्याचे स्वागतः
मॅच सुरू होण्याच्या 20 मिनिटे आधीच बॉलीवुड अॅक्ट्रेस ऐश्वर्या राय बच्चन स्टेडियमवर पोहोचली. तीचे स्वागत करण्यासाठी अभिषेक खुद्द एंट्रंस गेटवर उभा होता.

यू मुंबाचा सलग सहाव्यांदा विजयीः
सुरू असलेल्या प्रो कबड्‌डी सामन्यांमध्ये यू मुंबाने जबरदस्त खेळ करत विजयाचा शटकार लगावला आहे. त्यांनी त्यांच्या सहाव्या आणि रोमांचक सामन्यात तेलुगू टायटंसला 27-26 या फरकाने हारवले. यू मुंबाचा कर्णधार अनूप कुमार याने 10 गूण. तर, टायटंसकडून सुकेश हेगडेने 7 गूण मिळवले. या विजयाने यू मुंबाचे 30 गूण, तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या टायटंसचे 16 गुण झाले आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मॅच पाहण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, सोबतच अभिषेक-ऐश्वर्याचे टीमला चीअर करतानाचे फोटोज...