आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: फिगरचे कौतूक केले तर भडकली ही स्पोर्ट्स स्टार, असे फटकारले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एडलिन ग्रे ग्लॅमरस स्पोर्ट्स स्टार मानली जाते. - Divya Marathi
एडलिन ग्रे ग्लॅमरस स्पोर्ट्स स्टार मानली जाते.
न्यूयॉर्क- तू इतकी सुंदर आहेस मग रेसलर कशी असू शकते? ऑलिंपिकमध्ये क्वालिफाय झालेली अमेरिकन महिला हेवीवेट रेसलर एडलिन ग्रे ला लोक आश्चर्याने हा प्रश्न विचारतात. तेव्हा 25 वर्षाची एडलिन म्हणाली, अशा प्रश्नांचा मला राग येतो. एडलिनला वाटते की, लोकांनी केवळ तिच्या सौंदर्याचेच नव्हे तर रेसलिंग स्किलचेही कौतूक केले पाहिजे. पुरुष स्पोर्ट्स स्टार्सबाबतही केले कमेंट...
- एडलिनला असा राग येणे स्वाभाविक आहे. ती 3 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिली आहे. रिओ मध्ये गोल्ड जिंकण्याची ती प्रबळ दावेदार मानली जाते.
- असे असूनही तिला तिच्याच देशात फारसे महत्त्व दिले जात नाही. तिच्या खेळाबाबत बोलायचे सोडून लोक तिच्या सौंदर्याबाबत बोलतात.
- याचमुळे ती वैतागून म्हणते, जर असा कारनामा एखाद्या पुरुषाने केला असता ना तर तो आज देशाचा हिरो झाला असता.
- लोकांना वाटते की सुंदर मली रेसलिंग कशा करू शकतात.
- मी त्यांना सांगू इच्छिते की, हेवीवेट रेसलर बनण्यासाठी वाईट असणे गरजेचे नाही.
मुलांनाही हरविले-

- एडलिन जेव्हा 6 वर्षाची होती तेव्हा तिचे वडील तिला रेसलिंग ट्रेनिंग सेंटरमध्ये घेऊन गेले.
- तिच्या बहुतेक मैत्रिणी डान्सिंग आणि जिमनास्टिकमध्ये सहभाग घ्यायच्या.
- मात्र, एडलिनला मॅटवर विरोधकांना धोबीपछाड द्यायला मजा येते.
- हायस्कूल चॅम्पियनशिपमध्ये तिने मुलांनाही हरविले होते.
- 2009 मध्ये ती पहिल्यांदा अमेरिकेच्या वरिष्ठ संघात निवडली गेली.
- तेव्हा ती हायस्कूलमध्ये शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी होती.
15 वेळा झाली एडलिनच्या कानावर सर्जरी-
- एडलिनला जन्मताच डाव्या कानाने कमी ऐकायला येते. हा त्रास कमी करण्यासाठी तिने आतापर्यंत 15 वेळा सर्जरी केली आहे.
- डॉक्टरोंने तिला इशारा दिला आहे की, रेसलिंगमुळे ही समस्या आणखी वाढू शकते. मात्र, एडलिनने मात्र खेळण्याचा निर्णय कायम ठेवला.
- ती 2012 ऑलिंपिक ट्रायलच्या फायनलमध्ये हारली होती. मात्र, निराश न होता तिने आणखी मेहनत घेतली.
- त्यानंतर पुढल्याच वर्षी ती वर्ल्ड चॅम्पियन बनली. तिने 2014 आणि 2015 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ग्लॅमरस वुमन रेसलर एडलिनचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...