आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शारापोवा खेळली 18 महिन्यांनंतर पहिला ग्रँडस्लॅम सामना; हालेपवर मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- जगातील माजी नंबर वन खेळाडू रशियाच्या मारिया शारापोवाने डाेपिंगच्या १५ महिन्यांच्या बंदीनंतर मैदानावर उतरत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत दुसऱ्या मानांकित सिमोना हालेप हिला पराभूत करत जबरदस्त पुनरागमन केले. शारापोवाने हालेपवर ६-४, ४-६, ६-३ ने विजय मिळवला. शारापोवा गत वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेदरम्यान बंदी असलेले औषध सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळली होती. तिचा ऑस्ट्रेलियन ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये सेरेना विलियम्सकडून पराभूत झाल्यानंतरचा पहिला सामना होता. आता पुढील फेरीत तिचा सामना हंगेरीच्या टिमिया बाबोससोबत होईल. ब्रिटनच्या सातव्या मानांकित जोहाना कोंटाने सर्बियाच्या ७८ व्या मानांकित अलेक्जेंड्रा क्रुनिचवर ४-६, ६-३, ६-४ ने मात केली. क्रोएशियाच्या पाचव्या मानांकित मारिन सिलिचने अमेरिकेच्या टेनिस सेंडग्रेनला ६-४, ६-३, ३-६, ६-३ ने पराभूत केले. 

व्हीनसचे टेनिस जगतात २० वर्षे पूर्ण : अमेरिकेची दिग्गज टेनिस खेळाडू व नववी मानांकित व्हीनस विल्यम्सने स्लोव्हाकियाच्या व्हिक्टोरिया कुजमोवाला ६-३, ३-६, ६-२ ने पराभूत केले. टेनिस जगतात पदार्पण करून व्हीनसला २० वर्षे पूर्ण झाली. तिच्या करिअरमधील सातपैकी दोन ग्रँडस्लॅम किताब तिने अर्थर अॅश स्टेडियमवर मिळवले. वयाच्या १७ व्या वर्षी १९९७ मध्ये पदापर्ण केले होते. 

डेव्हिड फेररचा धक्कादायक पराभव
पुरुष गटात क्रमवारीत २१ व्या स्थानावर असलेल्या स्पेनच्या डेव्हिस फेररला पराभवाचा सामना करावा लागला. कजाकिस्तानच्या मिखाइल कुकुशकिनकडून त्याला धक्कादायक पराभवाला सामोरे जात स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. दुसरीकडे आठव्या मानांकित फ्रान्सच्या विल्फ्रेड सोंगाने रोमानियाच्या मारियस कोपिलला ६-३, ६-३, ६-४ ने मात दिली. पाचव्या मानांकित क्रोएशियाच्या मारिन सिलिचने अमेरिकेच्या टेनी सॅडग्रेनला रोमांचक लढतीत ६-४, ६-३, ३-६, ६-३ ने पराभूत केले. १० व्या मानांकित अमेरिकेच्या जॉन इस्नरने फ्रान्सच्या पियरे ह्युज हर्बटविरुद्ध ६-१, ६-३, ४-६, ६-३ ने मॅरेथॉन सामना जिंकला.  

कारिनो, अँडरसन पुढील फेरीत 
स्पर्धेतील १२ व्या मानांकित स्पेनच्या पाब्लो कारिनो याने अमेरिकेच्या इवान किंगला ६-३, ६-२, ७-६ ने हरवले. २८ व्या मानांकित दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनने अमेरिकेच्या जेसी एरागोनला ६-३, ६-३, ६-१ ने पराभवाची धूळ चारत पुढील फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे १७ व्या मानांकित सॅम क्वेरीने फ्रान्सच्या जाइल्स सिमोनला ६-४, ६-३, ६-४ ने आणि १९ व्या मानांकित लग्जम्बर्गच्या जाइल्स मुलरने ऑस्ट्रेलियाच्या बर्नार्ड टॉमिकला ३-६, ६-३, ६-४, ६-४ ने नमवले.

बारबाडोसचा किंग ठरला ग्रँड स्लॅमचा पहिला खेळाडू 
जर्मनीच्या अॅलेक्सांद्र ज्वेरेवने बारबाडोसच्या डारियन किंगला ७-६, ७-५, ६-४ ने हरवले. किंग हा पराभूत झालेला असला तरी कोणत्याही ग्रँड स्लॅममध्ये खेळणारा बारबाडोसचा तो एकमेव टेनिसपटू ठरला आहे. ज्वेरेवने सामन्यात ब्योर्न बाेर्गच्या शैलीत पाेलो टी शर्ट, हातात बँड, साधी शॉर्ट आणि गुडघ्यापर्यंत मोजे घालून सर्वांचे लक्ष वेधले. आता ज्वेरेव समोर क्राेएशियाच्या बोर्ना कोरिचचे आव्हान असेल.
बातम्या आणखी आहेत...