आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After 20 Years University Chess Contest In Aurangabad

२० वर्षांनंतर आंतरविद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धा औरंगाबादेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला २० वर्षांनंतर आंतरविद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली आहे. ही स्पर्धा १ ते ४ ऑक्टोबरदरम्यान विद्यापीठात होणार आहे. आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली.
अखिल भारतीय विद्यापीठ महासंघाने पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बुद्धिबळ (पुरुष व महिला) क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी दिली आहे. या संदर्भात सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी कुलसचिव डॉ. महेंद्र सिरसाट, संचालक डॉ. प्रदीप दुबे, डॉ. सय्यद अझरुद्दीन, डॉ. किशन धाबे, डॉ. सुहास मोराळे यांच्यासह तांत्रिक समितीचे सदस्य सुधीर भालेराव, एस. पी. तळेगावकर, संग्राम देशमुख, अभिजित वैष्णव आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेत भारतातील एकूण ५५ विद्यापीठांचे संघ सहभागी होणार असून त्यासाठी विद्यापीठ परिसरात पाचशेपेक्षा अधिक खेळाडू, संघ व्यवस्थापक, पंच अधिकारी यांचा समावेश राहणार आहे.

मुख्य आयोजन समिती : कुलगुरू डॉ. बी. ए.चोपडे (अध्यक्ष), कुलसचिव डॉ. महेंद्र सिरसाट, डॉ. सय्यद अझरुद्दीन, डॉ. सुहास मोराळे, संचालक साई- वीरेंद्र भांडारकर व सदस्य सचिव व क्रीडा संचालक प्राचार्य डॉ. प्रदीप दुबे.

तांत्रिक समिती - श्याम तळेगावकर, डॉ. दयानंद कांबळे, सुधीर भालेराव, हेमेंद्र पटेल.स्वागत समिती - डॉ. पी. टी. गोडबोले (अध्यक्ष), डॉ. सचिन पगारे, प्रा. सचिन देशमुख, प्रा. सागर कुलकर्णी, राकेश खैरनार, डॉ. युसूफ पठाण, सुरेंद्र मोदी, गणेश कड.

५५ विद्यापीठांचा सहभाग
२० वर्षांनंतर औरंगाबादला यजमानपद

ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्या हस्ते उद्घाटन
स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्या हस्ते येत्या गुरुवारी सकाळी ११ वाजता विद्यापीठ नाट्यगृह येथे होणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे राहणार आहेत. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अतुल सावे, अंकुशराव कदम (संचालक, महात्मा गांधी मिशन), कुलसचिव डॉ. महेंद्र सिरसाट, वित्त व लेखाधिकारी डॉ. सय्यद अझरुद्दीन, तांत्रिक समिती सदस्य श्याम तळेगावकर व क्रीडा संचालक प्राचार्य डॉ. प्रदीप दुबे यांची उपस्थिती राहणार आहे.