आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Double Delight For Dad Jonty Rhodes After Mumbai Indians IPL 2017 Triumph

जाँटी -होड्सच्या मुलाचाही जन्म मुंबईतच, मुलगी जन्मली तेव्हाही मुंबईला विजेतेपद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाँटीची पत्नी मेलानी नवजात नाथन आणि मुलगी इंडियासह..... - Divya Marathi
जाँटीची पत्नी मेलानी नवजात नाथन आणि मुलगी इंडियासह.....
मुंबई- मुंबई इंडियन्सने रविवारी आयपीएलचे विजेतेपद जिंकले. त्याच दिवशी मुंबईचे फिल्डिंग कोच जाँटी ऱ्होड्स दुसऱ्यांदा पिता बनले. त्यांची पत्नी मेलानी हिने मुंबईच्या सांताक्रूझ रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला. यानंतर या दक्षिण आफ्रिकन जोडप्याने बाळाचे नाव नाथन ठेवले. ऱ्होड्स यांना दोन वर्षांची मुलगीसुद्धा आहे. तिचे नाव त्यांनी 'इंडिया' ठेवले आहे. तिचा जन्म 24 एप्रिल 2015 रोजी मुंबईत झाला. त्या सत्रात सुद्धा मुंबई इंडियन्सने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. मेलानीची डिलिव्हरी वॉटर बर्थ थेरपीने झाली. यावेळी जाँटी संघासोबत हैदराबादेत होता. ऱ्होड्सने आई आणि बाळांचा हा फोटो शेअर करून पिता बनल्याची माहिती दिली. फायनलनंतर ऱ्होड्स सोमवारी मुंबईत कुटुंबाकडे पोहोचला. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, जाँटीच्या भारताच्या कनेक्शनबाबत....
बातम्या आणखी आहेत...