आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा वुमन स्पोर्ट्स स्टारने केले न्यूड फोटोशूट, कुटुंबात उडाली एकच खळबळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेनिस सुपरस्टार आणि जगातील नंबर तीनची फिमेल प्लेअर अग्निजस्का रादांवास्काने मंगळवारी विम्बल्डन टूर्नामेंटमध्ये पहिली मॅच खेळली. या मॅचमध्ये तिला चिअरअप करण्यासाठी अग्निजस्काची आई उपस्थिती होती परंतु तिचे वडील आणि माजी कोच रॉबर्ट रादांवास्का (54) दिसले नाहीत. ते मुलीवर नाराज असल्यामुळे मॅच पाहण्यासाठी आले नाहीत. यामागे अग्निजस्काने केलेले न्यूड फोटोशूट हे कारण आहे. या फोटोशूटने यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला असून अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांना बोलतसुद्धा नाहीत.

न्यूड फोटोशूटमुळे निर्माण झाल्या अडचणी
- अग्निजस्काने टेनिस खेळणे आपल्या वडिलांकडूनच शिकले. वडीलच तिचे पाहिले कोच होते.
- आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तिने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये विजय मिळवला आणि आपला देश पोलंडचे नेतृत्व केले.
- सध्या या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला असून ते एक घरातही राहत नाहीत.
- काही वर्षांपूर्वी या टेनिस स्टारने एक न्यूड फोटोशूट केले, ज्यामुळे अग्निजस्काच्या फॅन्समध्ये तसेच कुटुंबातही खळबळ उडाली होती.

वडिलांच्या एका चुकीमुळे नाराज झाली मुलगी
- या फोटोशूटमुळे घरात झालेल्या वादाविषयी स्वतः अग्निजस्काची आई मार्टा रदवांस्काने एक मुलाखतीमध्ये सांगितले.
- त्यांच्यानुसार, पोलंडमधील क्रोव शहरात राहणारे अग्निजस्काचे वडील कडक स्वभावाचे आणि अत्यंत धार्मिक आहेत.
- त्यांच्या घरामध्ये धार्मिक परंपरेचे पूर्ण पालन केले जात होते तसेच मुलींनी जास्त सोशल होणे आणि बॉयफ्रेंड बनवण्यावर बंदी होती.
- परंतु मुलींसाठी नियम बनवणाऱ्या त्यांच्या वडिलांनी काही वर्षांपूर्वी एका दुसऱ्या महिलेसाठी आपल्या पत्नीला सोडले.
- त्यानंतर या टेनिस स्टारने वडिलांना धडा शिकवण्याची दुसरी शक्कल शोधून काढली.
- अग्निजस्काने न्यूड फोटोशूट करून आपल्या वडिलांना खूप दुःखी केले. या फोटोशूटमध्ये अग्निजस्का पूर्णपणे न्यूड होती.
- काही दिवसांनंतर आईने या दोघांमधील नाते जोडण्याचा प्रयत्न केला परंतु काहीही फायदा झाला नाही.
- याच कारणामुळे अग्निजस्काचे वडील आजही मुलीची मॅच बघण्यासाठी जात नाहीत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा या टेनिस सुपरस्टारच्या स्टाइलिश लाइफचे खास फोटो...
बातम्या आणखी आहेत...