आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aguero Header Gives Argentina Copa América Win Over Uruguay

उरुग्वेला नमवून अर्जेंटिना विजयी, सेर्जिओ अॅगुएरो ठरला विजयाचा शिल्पकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वृत्तसंस्था- ला सेरेना (चिली) कोपा अमेरिका चषक फुटबाॅल स्पर्धेतील पहिल्या फेरीच्या रोमांचक लढतीत सर्जिओ अॅगुएरोने नोंदवलेल्या देखण्या गोलमुळे अर्जेंटिनाने पारंपरिक प्रतिस्पर्धी उरुग्वेवर १-० गोलने मात करून आव्हान कायम राखले.

‘ब’ गटातील या लढतीत सामन्याच्या ५६ व्या मिनिटाला इंग्लिश प्रीमियर लीगचा स्टार अॅगुएरोने मँचेस्टर सिटी संघातील सहकारी पाब्लो झाबलेटाच्या क्राॅसला हेडरद्वारे गोलची दिशा देऊन तुल्यबळ लढतीचे पारडे अर्जेंटिनाच्या बाजूने झुकवले.

२०११ च्या विजेत्या उरुग्वेला अंतिम आठ संघांमध्ये स्थान कायम ठेवण्यासाठी गटातील अंतिम लढतीत पॅराग्वेला नमवावेच लागेल. १९३० च्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या उरुग्वे अन् अर्जेंटिना या दोन दक्षिण अमेरिकन प्रतिस्पर्ध्यांमधील ही १९९ वी लढत होती. पहिल्या सामन्यात अर्जेंटिनाला पराग्वेने आश्चर्यजनकरीत्या २-२ गोलने बरोबरीत रोखले. त्यामुळे चवताळलेल्या अर्जेंटिना संघाने उरुग्वेवर सामन्याच्या पूर्वार्धात वेगवान हल्ले चढवले. परंतु त्यांना प्रतिस्पर्ध्यांची मजबूत बचाव फळी भेदता आली नाही. दरम्यान गाेल करण्याच्या दोन चांगल्या संधी त्यांनी हातून गमावल्या.

रंजक निर्णायक गोल
सामन्याच्या ५६ व्या मिनिटाला पॅरिस सेंट-जर्मन संघाचा मिडफील्डर जवियर पॅस्टोरने चेंडू फुल बॅक झबालेटाकडे सोपवला त्यानंतर झबालेटाने गोलच्या दिशेने उंचावून किक हाणली. अॅगुएरो या संधीची वाटच बघत होता. त्याने झेप घेत हेडरद्वारे चेंडू घरात धाडला.