आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Rai Bachchan Agrees To Dance For ISL Opening Ceremony

ISL च्या ओपनिंगमध्ये ऐश्वर्या रायचा डान्स परफॉर्मन्स, चाहत्यांना करेल \'क्रेझी\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयएसएलच्यावेळी फनी मूडमध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन. - Divya Marathi
आयएसएलच्यावेळी फनी मूडमध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन.
मुंबई- बॉलीवुड अॅक्ट्रेस ऐश्वर्या राय बच्चन इंडियन सुपर लीगच्या (ISL) ओपनिंग सेरेमनीत परफॉर्म करेल. या फुटबॉल टूर्नामेंटची सुरूवात तीन ऑक्टोबरपासून चेन्नई येथून होईल. तीन ऑक्टोबरला अभिषेक बच्चनची फुटबॉल टीम चेन्नईयन एफसीचा पहिला सामना होणार आहे. अभिषेक, वीता दानी आणि महेंद्रसिंह धोनी या फुटबॉल टीमचे को-ऑनर्स आहेत. याच सामन्यात अभिषेकसाठी ऐश्वर्या स्टेज परफॉर्मंस देणार आहे.
यावेळी एश्वर्या आभिषेकला सपोर्ट करण्यासाठी तेथेच असणार आहे. कदाचित यामुळेच, तिला जेव्हा ओपनिंग सेरेमनीमध्ये परफॉर्म करण्यासाठी आमत्रण मिळाले तेव्हा तिने सहजतेने होकार दिला.
या गाण्यावर करणार डान्स
एश्वर्याच्या कमबॅक फिल्मचे डायरेक्टर संजय गुप्ता यांनी सांगितले की, यात अनेक बॉलीवुडचे दिग्गज परफॉर्म करणार आहे. मात्र ऐश्वर्या संपूर्ण परफॉर्मंस झाल्यानंतरही ग्रॅन्ड फिनालेमध्येही परफॉर्म करेल. ती यात तिच्याच काही चर्चित गाण्यांवर परफॉर्म करणार आहे. या गाण्यांमध्ये क्रेझी किया रे (धूम 3), डोला रे (देवदास) "रोबोट' चे एक गाणे आणि नवीन सिनेमाचे गाणे "आज रात का सीन बना ले' यांचा समावेश असेल. कोरियोग्राफर श्यामक डावर तिला कोरियोग्राफ करतील'

प्रदीर्घ काळानंतर करतेय कम बॅक
एश्वर्याने प्रदीर्घ काळानंतर परत एकदा सिनेमा जगतात कम बॅक केले आहे. तिचा नवीन सिनेमा लवकरच पडद्यावर येण्याच्या तयारित आहे. या बरोबरच ती इतरही वर्क कमिटमेंट्स पूर्ण करण्यात व्यस्त आहे. मसलन ब्रॅन्ड अॅन्डोर्समेंट, फॅशन शोजमध्ये उपस्थिती आदी.
मागच्याच महिन्यात ती, फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या शो-स्टॉपर होऊन रॅम्पवर उतरली होती. पुन्हा ती तिच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या क्षणी आणि एका टीव्ही शोमध्ये ही दिसली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ऐश्वर्या रायचे आयएसएल आणि कबड्डीलीगदरम्यानचे काही खास फोटो...