आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅनडा आेपन बॅडमिंटन : साईप्रणीत, आनंद, जयरामची आगेकूच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलागरी - भारताचे युवा खेळाडू बी. साईप्रणीत, आनंद पवार आणि अजय जयरामने कॅनडा आेपन ग्रँडप्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेतील आपली विजयी माेहीम अबाधित ठेवली. यासह या खेळाडूंनी प्री-क्वार्टरमध्ये धडक मारली. दुसरीकडे पुरुष दुहेरीच्या दुसर्‍या फेरीत दिलशाड आणि काेना तरुणला पराभवाचा सामना करावा लागला. तसेच पी. सी. तुलसीलाही पराभवामुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. एकूणच भारतासाठी स्पर्धेचा तिसरा दिवस हा संमिश्र यश देणारा ठरला. जपानच्या युही हाशिमाेताने महिला एकेरीच्या दुसर्‍या फेरीत २१-८, २१-११ ने तुलसीचा पराभव केला.

नवव्या मानांकित अजय जयरामने दमदार खेळी करताना ३४ मिनिटांमध्ये एकतर्फी विजयाची नाेंद केली. त्याने लढतीत चीनच्या हुआंग युक्झिंगचा पराभव केला. भारताच्या खेळाडूने २१-१५, २१-१६ ने सामना जिंकला. यासह त्याने तिसरी फेरी गाठली.

चीनच्या झु शियानविरुद्ध सामन्यात भारताच्या आनंद पवारने शानदार विजय मिळवला. त्याने २१-१७, २१-१६ अशा फरकाने विजय मिळवला. यासह त्याने पुढच्या फेरीत धडक मारली.

तन्वीचा शानदार विजय
भारताची युवा महिला खेळाडू तन्वी लाडने २८ मिनिटांमध्ये एकेरीचा सामना जिकंला. तिने अमेरिकेच्या जामिई सुबांधीवर २१-११, २१-१४ ने मात केली. यासह तिने महिला एकेरीच्या पुढच्या फेरीत यशस्वीपणे धडक मारली आहे.

प्रणीतचा २८ मिनिटांत विजय
दहाव्या मानांकित प्रणीतने पुरुष एकेरीच्या दुसर्‍या फेरीत चेक गणराज्यच्या जान फ्राेहचीचा पराभव केला. त्याने २१-१४, २१-१६ अशा फरकाने विजय मिळवला. त्याने २८ मिनिटांमध्ये दमदार खेळी करत शानदार एकतर्फी विजय साकारला.
बातम्या आणखी आहेत...