आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Allahabad Sunil Gulati In Race Of Fifa President

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष: फिफा अध्यक्षाच्या स्पर्धेत अलाहाबादचे सुनील गुलाटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाॅशिंग्टन - बेसबाॅल आणि बास्केटबाॅलचा देश अमेरिकेत फुटबाॅलला नाव मिळवून देण्याचे श्रेय जाते भारतीय वंशाचे सुनील गुलाटी यांना. ५५ वर्षीय सुनील फिफा व अमेरिकी फुटबाॅल वर्तुळातील बडी असामी आहेत. सॅप ब्लॅटर यांच्या राजीनाम्यानंतर नव्या फिफा अध्यक्षांच्या शर्यतीत त्यांचे नाव आघाडीवर आहेे. अर्थतज्ज्ञ सुनील वयाच्या पाचव्या वर्षी अमेरिकेत गेले. अमेरिकेत फुटबाॅल फीव्हर निर्माण करणा-या गुलाटींची ही कथा....

कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.फिल., ९ वर्षे अमेरिकी फुटबाॅल फेडरेशनचे अध्यक्ष
अमेरिकेला १९९४मध्ये पहिल्यांदा फिफा वर्ल्ड कपचे यजमानपद मिळाले होते. अर्थात अमेरिकी संघ सामन्यांत कोठेही नव्हता, तरीही अमेरिकेत स्पेन, ब्राझील, फ्रान्ससारखा फुटबाॅल फीव्हर पसरला. अमेरिकेला हे स्थान मिळवून देण्यामागे हात होता सुनील गुलाटी यांचा. अलाहाबादहून अमेरिकेतील कनेक्टिकटला जाणा-या सुनील यांनी कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.फिल. केले. याच विद्यापीठात ते शिकवतात. फुटबाॅल कोचप्रमाणे वर्गात अर्थशास्त्राचे फंडे समजावणारे गुलाटी २१ व्या वर्षी स्टेट यूथ टीमचे असिस्टंट कोच झाले. सध्या ९ वर्षांपासून अमेरिकी फुटबाॅल फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. हा एक विक्रमच आहे. अमेरिकी फुटबाॅल फेडरेशनमध्ये लाखो-कोट्यवधींची स्पाॅन्सरशिप आणि टीव्ही राइट्सच्या करारांत पारदर्शकता, कमिशन बंद करणे व स्वच्छ प्रतिमा ही गुलाटी यांची बलस्थाने आहेत. फिफाच्या वर्तुळात ते सॅप ब्लॅटर यांच्यावर उघड टीकेसाठीही ते ओळखले जातात. त्यामुळे फिफाच्या कार्यकारी समितीत त्यांच समर्थक कमी, विरोधक जास्त आहेत. अमेरिकेत महिलांची पहिली प्रोफेशनल फुटबाॅल लीगदेखील २०१२मध्ये गुलाटी यांनीच सुरू केली. फिफामध्ये ९६० कोटींचा घोटाळा काढणारे चक ब्लेजर समितीतून बाहेर पडल्यावर गुलाटींना संधी मिळाली होती.