आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • FIH Hockey World League: Manpreet, Walmiki, Ramandeep Star As India Beat France 3 2

वर्ल्ड हाॅकी लीग : वाल्मीकी बंधूंचा धमाका; भारताचा विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अँटवर्प - मुंबईच्या युवराज (२३ मि.) व देविंदर (५२ मि.) या वाल्मीकी बंधूंनी भारतीय संघाला एफआयएचच्या वर्ल्ड हाॅकी लीग सेमीफायनलमध्ये विजय मिळवून दिला. फाॅर्मात असलेल्या भारताने मंगळवारी पाेलंडचा ३-० ने पराभव केला. यासह सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली भारताने दुसर्‍या विजयाची नाेंद केली. भारताने सलामीला फ्रान्सला नमवले.

युवराजने २३ व्या मिनिटाला भारताकडून गाेलचे खाते उघडले. यासह भारताने १-० ने आघाडी घेतली. त्यानंतर कर्णधार सरदारा सिंगने ४२ व्या मिनिटाला भारताकडून दुसर्‍या गाेलची नाेंद केली. या वेळी पिछाडीवर असलेल्या पाेलंडने गाेलचे खाते उघडण्यासाठी जाेरदार प्रयत्न केले. मात्र, या टीमला समाधानकारक यश मिळाले नाही. त्यानंतर ५२ व्या मिनिटाला देविंदरने गाेल करून भारताला विजय मिळवून दिला.

भारतीय महिला पराभूत
रितू राणीच्या नेतृत्वाखाली विजयाचे खाते उघडण्याच्या प्रयत्नात असलेला भारतीय महिला संघ सपशेल अपयशी ठरला. भारतीय महिला टीमला सलग दुसर्‍या सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. न्यूझीलंडने भारतीय महिला संघाला ५-० ने धूळ चारली. या वेळी भारतीय महिला टीममधील अव्वल खेळाडूूंना समाधानकारक अशी खेळी करता आली नाही.
बातम्या आणखी आहेत...