आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing Facts About 38 Years Old American Professional Boxer Floyd Mayweather

PHOTOS : 2000 कोटी कमावणारा बॉक्‍सर, पण आई ड्रग्‍ज तर काकू ठरली एड्सची बळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात श्रीमंत बॉक्‍सर फ्लॉईड मेवेदर याने 12 सप्‍टेंबरला पुन्‍हा एकदा रिंगमध्‍ये उतरण्‍याचा निर्णय घेतला आहे. अजून प्रतिस्‍पर्धी बॉक्‍सरच्‍या नावाचीही घोषणा झाली नाही. 'फाईट ऑफ द सेंच्युरी' अर्थात बॉक्सिंगच्या महामुकाबल्यात अमेरिकेच्या फ्लॉईड मेवेदरने बाजी मारली होती. मेवेदरने फिलिपिन्सच्या मॅनी पॅकियाओचा पराभव केला. 2 मे रोजी हा महामुकाबला झाला होता. divyamarathi.com वर जाणून घ्‍या मेवेदरच्‍या जीवनातील काही रंजक बाबी.
फोर्ब्सच्‍या नुसार मेवेदर हा 2015 मध्‍ये सुमारे 2 हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक कमाई करणारा सर्वात श्रीमंत बॉक्‍सर आहे. त्‍याचे बालपण हे अत्‍यंत संघर्षमय आहे. मेवेदरच्‍या आईला ड्रग्‍जचे व्‍यसन होते, तर त्‍याची काकूही एड्सडा बळी ठरली. एका मुलाखतीत मेवेदरने आपल्‍या वडिलांबाबत सांगताना म्‍हटले, 'माझ्या वडिलांनी मला कधी मुलगा मानलेच नाही, ते कधीच मला त्‍यांच्‍यासोबत कुठे फिरायलाही नेत नसत, ना माझा लाड त्‍ो पुरवत.'
मेवेदरचा बहुमान परत घेतला
नियमांचे उल्‍लंघन केल्‍याचे कारण दाखवत जागतिक बॉक्सिंग संघटनेने (WBO) मेवेदरकडून 'फाईट ऑफ द सेंच्युरी' हा बहुमान परत घेतला. यासाठी मंजूर असलेली फी त्‍याने भरली नसल्‍याचे सांगण्‍यात आले होते. या विषयानंतर मेवदरने संघटनेला सुमारे 1260 कोटी रूपयाची परतफेड केली नव्‍हती.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून जाणून घ्‍या, मेवेदरविषयी आणखी रंजक बाबी..