आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America World Champion! Woman Worldcup Final Us Defeated Japan

अमेरिका वर्ल्ड चॅॅम्पियन! महिला वर्ल्डकप फायनलमध्ये अमेरिकेची जपानवर ५-२ ने मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला फुटबॉल वर्ल्डकपच्या फायनलमध्ये गतविजेत्या जपानचा ५-२ ने धुव्वा उडवल्यानंतर अमेरिकन महिला संघाने विजयी करंडकासह असा जल्लोष केला. - Divya Marathi
महिला फुटबॉल वर्ल्डकपच्या फायनलमध्ये गतविजेत्या जपानचा ५-२ ने धुव्वा उडवल्यानंतर अमेरिकन महिला संघाने विजयी करंडकासह असा जल्लोष केला.
व्हँकुव्हर - अमेरिकेने गत चॅम्पियन जपानला पराभूत करून फिफा महिला फुटबॉल वर्ल्डकपचे विजेतेपद पटकावले. अमेरिकेने तिस-यांदा ही स्पर्धा जिंकली. फायनल लढतीत कर्णधार कार्ली लॉयडच्या हॅट्ट्रीकच्या बळावर अमेरिकेने जपानला ५-२ ने पराभूत करून मोठा विजय मिळवला. यासह मागच्या वर्ल्डकप फायनलमध्ये जपानकडून झालेल्या पराभवाचा हिशेबही अमेरिकेने चुकता केला. अमेरिकेने यापूर्वी १९९१ आणि १९९९ मध्ये किताब जिंकले आहेत. तीन वेळा ही स्पर्धा जिंकणारे अमेरिका पहिले राष्ट्र ठरले आहे.
अमेरिकेचा हल्लाबोल
२०११ च्या फायनलमध्ये अमेरिकेचा जपानकडून पराभव झाला होता. मात्र, या वेळी अमेरिकेने जपानला एकतर्फी लढतीत पराभूत केले. अमेरिकन संघाने आक्रमक सुरुवात केली. जपानला काही कळेल त्या आधी अमेरिकेने सामन्यात दे दणादण चार गोल करून टाकले. अमेरिकेची कर्णधार लॉयडने सामन्याच्या तिस-या मिनिटातच गोल करून संघाचे खाते उघडले. आणखी दोन मिनिटांनंतर एक गोल केला. लॉयडचा दुसरा गोल होऊन दहा मिनिटेसुद्धा झाली नव्हती. तोपर्यंत १४ व्या मिनिटाला लॉरेन हॉलिडेने आणखी एक गोल केला. अमेरिकेच्या जबरदस्त आक्रमणापुढे जपानला सावरण्याची संधीच मिळाली नाही. जपानची टीम सांभाळण्याआधीच अमेरिकेने लॉयडच्या हॅट्ट्रीकच्या (१६ व्या मिनिटाला तिसरा गोल) अमेरिकेने ४-० आघाडी घेतली. १६ व्या मिनिटालाच अमेरिकेचा विजय जवळपास निश्चित दिसत होता.

यानंतरही दोन्ही संघांनी एकेक गोल केला. जपानच्या युकी ओगिमीने २७ व्या मिनिटाला आणि अमेरिकेच्या टॉबिन हिथने ५४ व्या मिनिटाला गोल केले. जपानचा चार गोलने पराभव झाला असता. मात्र, अमेरिकेच्या ज्युली जांसटनने ५२ व्या मिनिटाला आत्मघाती गोल करून पराभवाचे अंतर कमी केले. अमेरिकेने सुरुवातीपासून सामन्यावर जी पकड मिळवली, ती अखेरपर्यंत कायम होती.

लॉयडला 'गोल्डन बॉल'
२२ वर्षीय अमेरिकेची कर्णधार कार्ली लॉयडला 'गोल्डन बॉल’चा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. लॉयडने स्पर्धेत एकूण ६ गोल केले. यातील तीन गोल तर तिने फायनलमध्ये केले.

पोपटाचा भरवसा मोडला
टोकियोच्या 'लिविया' नावाच्या महिला पोपटाने जपान विजेतेपद जिंकेल अशी भविष्यवाणी केली होती. मात्र, ही भविष्यवाणी चुकीची ठरली. फायनलपूर्वी या पोपटाच्या सर्व सहा भविष्यवाण्या ख-या ठरल्या.

व्हाइट हाऊसचे खेळाडूंना निमंत्रण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबाम यांनी टि्वट केले, 'अमेरिकेचा शानदार विजय. कार्ली लॉयड आणि संपूर्ण संघाने शानदार खेळ केला. देशाला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे. वर्ल्डकप ट्रॉफीसह लवकर व्हाइट हाऊसला या.'