आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन अाेपन: स्टीफन्सने रचला इतिहास; 15 वर्षांनंतर चॅम्पियनचा नवा चेहरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयाॅर्क- अव्वल खेळाडू स्लाेएन स्टीफन्सने सत्रातील शेवटच्या  ग्रँडस्लॅम अमेरिकन अाेपन टेनिस स्पर्धेत रविवारी इतिहास रचला. तिने महिला एकेरीचे विजेतेपद अापल्या नावे केले. यासह तब्बल १५ वर्षांनंतर चॅम्पियनसाठी पहिल्यांदा सेरेना अाणि व्हीनसशिवाय अमेरिकन खेळाडूचा नवा चेहरा मिळाला अाहे.  यापूर्वी, २००२ मध्ये जेनिफरने २००२ मध्ये अाॅस्ट्रेलियन अाेपनचा किताब पटकावला हाेता.  

अमेरिकेच्या स्टीफन्सने एकेरीच्या फायनलमध्ये अापल्याच देशाच्या मेडिसन कियासवर सहज मात केली. तिने ६-३, ६-० अशा फरकाने एकतर्फी विजय संपादन केला. यासह तिने अापल्या टेनिस करिअरमध्ये पहिल्यांदा ग्रँडस्लॅम चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. या साेनेरी यशाला गवसणी घालणाऱ्या स्टीफन्सला ट्राॅफी अाणि ३.७ मिलियन युराे देऊन गाैरवण्यात अाले. तिने महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यामध्ये सात वेळच्या ग्रँडस्लॅम चॅम्पियन व्हीनसचा पराभव केला अाणि अंतिम फेरी गाठली हाेती. यासह तिने अापली विजयाची ही माेहीम अबाधित ठेवताना अंतिम सामनाही जिंकला. 

मार्टिना हिंगीस मिश्र दुहेरीत चॅम्पियन 
माजी नंबर वन मार्टिना हिंगीसने मिश्र दुहेरीमध्ये चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. तिने अापल्या अमेरिकन सहकारी मरेसाेबत हे साेनेरी यश संपादन केले.  हिंगीस-मरेने फायनलमध्ये तिसऱ्या मानांकित व्हीनस-चानचा पराभव केला. या अव्वल मानांकित जाेडीने ६-१, ४-६, १०-८ ने सामना जिंकला. 

जानेवारीत शस्त्रक्रिया; दमदार कमबॅक 
अमेरिकेच्या २४ वर्षीय स्टीफन्सच्या पायावर जानेवारीमध्ये शस्त्रक्रिया झाली हाेती. दरम्यान, तीन महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर तिने टेनिस काेर्टवर दमदार पुनरागमन केले अाणि थेट अमेरिकन अाेपनचा किताब पटकावला.

पाचवी बिगरमानांकित चॅम्पियन 
स्टीफन्सने  किताबासह अनेक विक्रमांना गवसणी घातली. चॅम्पियन ठरलेली ती पाचवी बिगरमानांकित खेळाडू ठरली. हाच पराक्रम यंंदाच्या सत्रामध्ये लॅटव्हियाच्या जेलेना अाेस्तापेकाेने केला. तिने यंदा फ्रेंच अाेपनमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. तिला स्पर्धेत मानांकन मिळालेले नव्हते.    
बातम्या आणखी आहेत...