आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन ओपन; क्वितोवा, सेवात्‍सोवा विजयी; शारापोवा, मुगुरुझाचे पॅकअप, सानिया विजयी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 न्यूयार्क- चेक गणराज्याची पेत्रा क्विताेवा अाणि १६ व्या मानांकित अनास्तासिजा सेवात्साेवाने साेमवारी अमेरिकन अाेपन टेनिस स्पर्धेत सनसनाटी विजयाची नोंद केली. विम्बल्डन चॅम्पियन मुगुरुझा अाणि पाच वेळची चॅम्पियन मारिया शारापाेवाला अनपेक्षित पराभवामुळे पॅकअप करावे लागले. भारताच्या सानिया मिर्झाने  महिला दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. 
 
माजी नंबर वन व्हीनसने अंतिम अाठमध्ये प्रवेश केला. तिने अंतिम १६ च्या सामन्यामध्ये स्पेनच्या कार्ला सुअारेझ नवाराेचा पराभव केला. तिने ६-३, ६-३,६-१ अशा फरकाने सामना जिंकला. यासह तिला उपांत्यपूर्व फेरीतील अापला प्रवेश निश्चित करता अाला. अाता तिचा सामना चेक गणराज्याच्या पेत्रा क्विताेवाशी हाेईल.   

पेस-पुरवचा पराभव : भारताच्या अनुभवी टेनिसस्टार लिएंडर पेसला पराभवाचा सामना करावा लागला. पेस अाणि पुरव राजाचा पुुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीमध्ये पराभव झाला. अांद्रे रबलेव अाणि कारेनने सामन्यात पेस-पुरवला ६-४, ७-६ ने पराभूत केले. यासह त्यांनी पुढची फेरी गाठली. 

क्विताेवाची मुगुरुझावर १०५ मिनिटांत मात : चेक गणराज्याच्या पेत्रा क्विताेवाने महिला एकेरीच्या अंतिम १६ मध्ये सनसनाटी विजयाची नोंद केली. तिने लढतीमध्ये यंदाची किताबाची प्रबळ दावेदार असलेल्या मुगुरुझाचा पराभव केला. तिने ७-६, ६-३  ने एकतर्फी विजय मिळवला. 
प्लिस्काेवाची अागेकूच : नंबर वन कॅराेलिना प्लिस्काेवाने महिला एकेरीच्या अंतिम अाठमध्ये धडक मारली. तिने अंतिम १६ च्या सामन्यामध्ये अमेरिकेच्या बेर्डीचा पराभव केला. तिने ६-१, ६-० अशा फरकाने एकहाती विजय संपादन करून पुढची फेरी गाठली. 

सानिया विजयी 
भारताच्या सानिया मिर्झाने अापली सहकारी पेंग शुअाईसाेबत महिला दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत राेमहर्षक विजय संपादन केला. या चाैथ्या मानांकित जाेडीने रंगतदार सामन्यात साेराना सर्सटिया अाणि साराचा पराभव केला. त्यांनी ६-२, ३-६, ७-६ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्यांनी अंंतिम अाठमध्ये धडक मारली.

सेवात्‍सोवाकडून शारापोवा पराभूत
लॅटव्हियाच्या सेवात्साेवाने महिला एकेरीच्या अंतिम १६ मध्ये सनसनाटी विजय मिळवला. तिने रशियन टेनिस सुंदरी मारिया शारापाेवाला धूळ चारली. तिने ५-७, ६-४, ६-२ ने सामना जिंकला. यासह तिने अंतिम अाठमधील अापला प्रवेश निश्चित केला. दमदार सुरुवात करणाऱ्या शारापाेवाची झंुज अपयशी ठरली.
बातम्या आणखी आहेत...