आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन ओपन टेनिस : राफेल नदाल तिसऱ्या फेरीत; मुगुरुजाचा सनसनाटी पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- तिसरीमानांकित आणि फ्रेंच ओपनची चॅम्पियन स्पेनच्या गरबाईन मुगुरुजाचा बिगर मानांकित लात्वियाच्या अनात्सासिजा सेवासोवाकडून महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत धक्कादायक पराभव झाला. पुरुष गटात स्पेनच्या राफेल नदालने इटलीच्या आंद्रियस सेप्पीला ६-०, ७-५, ६-१ ने हरवले. पुरुष गटात रेयान हॅरिसने राओनिकला पराभूत करून धक्कादायक विजय मिळवला.

तिसरी मानांकित मुुगुरुजा चौथ्यांदा यूएस ओपनमध्ये खेळत आहे. मात्र, ती आतापर्यंत एकदाही तिसरी फेरी ओलांडू शकली नाही. मुगुरुजाला बिगर मानांकित सेवासोवाने सरळ सेटमध्ये ७-५, ६-४ ने पराभूत केले.

कर्बरची बरोनीवर मात : महिलांच्याइतर सामन्यांत दुसरी मानांकित जर्मनीच्या अँजोलिक कर्बरने क्रोएशियाच्या बिगर मानांकित लुसिस बरोनीला ६-२, ७-६ ने हरवले. कर्बरने सामन्यात ३७ विनर्स मारून आक्रमक खेळ केला. पहिला सेट तिने सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये तिने टायब्रेकरमध्ये बाजी मारली.

राओनिकचाधक्कादायक पराभव : महिलांप्रमाणेपुरुष गटातही धक्कादायक निकाल लागले. पाचवा मानांकित कॅनडाच्या मिलोस राओनिका अमेरिकेच्या रेयान हॅरिसने ६-७, ७-५, ७-५, ६-१ ने हरवले. दहावा मानांकित फ्रान्सच्या गाएल मोंिफल्सने चेक गणराज्यचा खेळाडू जॉन सतरालला ७-५, ६-४, ६-३ ने मात दिली. फ्रान्सच्या जो. विल्फ्रेड सोंगाने ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थला ६-४, ३-६, ६-३, ६-४ ने मात दिली.
सानिया, बोपन्ना, पेस दुसऱ्या फेरीत
भारताची टेनिस स्टार खेळाडू आणि दुहेरीतील वर्ल्ड नंबर वन सानिया मिर्झा, अनुभवी खेळाडू लिएंडर पेस आणि रोहन बोपन्ना यांनी दुहेरीतील आपापले सामने जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सानियाने आपली नवी महिला जोडीदार चेक गणराज्यच्या बारबोरा स्ट्रायकोवासोबत अमेरिकेची जोडी मी हार्ट आणि अॅना शिबारा यांना ६-३, ६-२ ने हरवले. मिश्र दुहेरीत लियांडर पेस आणि मार्टिना हिंगीस या जोडीने अमेरिकेच्या साशिया विर्की आणि फ्रान्सिस टियाफोए या जोडीला ६-३, ६-२ ने मात दिली. पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना आणि डेन्मार्कचा फ्रेडरिक निल्सन या जोडीने चेक गणराज्याचा रादेक स्तेपानेक आणि सर्बियाचा नेनाद जिंमोजिच या जोडीला ६-३, ६-७, ६-३ ने पराभूत करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. यासह त्यांना अागेकूच करता अाली.

पोर्टेबल छताखाली नदाल-सेप्पीचा सामना
पुरुषएकेरीत नदालने १५ कोटी डॉलर रकमेतून तयार झालेल्या ऑर्थर अॅश स्टेडियमच्या नव्या पोर्टेबल छताखाली आपला पहिला सामना खेळला. नदालचा अाता पुढचा सामना आंद्रे कुज्नेत्सोवशी होईल. त्याने स्पेनच्या अल्बर्ट रामोसला ७-५, ६-४, ७-६ ने हरवले.
बातम्या आणखी आहेत...