आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan Recorded A Song For Pro Kabaddi Season 2

VIDEO: बिग बींनी गायले प्रो कबड्डीचे थीम सॉन्ग, स्‍टुडिओमध्‍ये केली धम्माल मस्ती!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रो कबड्डीच्या दुसरे पर्व 18 जुलैला सुरू होत आहे. या पर्वाचे प्रमोशनल साँग महानायक अमिताभ बच्चन यांच्या आवाजात आहे. 'ले पंगा' असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्‍याच्‍या रेकॉर्डिंगदरम्‍यान अमिताभ बच्‍चन यांनी स्‍टुडिओमध्‍ये धम्माल मस्तीही केली. बिग बी यांचा दमदार आवाज आणि उत्‍साहाने भरलेले गाणे या पॅकेजमधून आम्ही अापल्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत. तेे बिग बींच्या चाहत्‍यांना नक्‍कीच आवडेल.
संगीतापासून माणसाने दूर राहू नये
अमिताभ बच्‍चन यांनी रेकॉर्डिंगचे फोटो 'ट्विटर'वर शेअर केले आहेत. ''संगीताच्‍या सुरांमधून मिळणारा आनंद संपूर्ण जगात कशातूनच मिळत नाही. म्‍हणून माणसाने संगीतापासून दूर राहू नये.'', असेही बिग बी यांनी लिहिले आहे.
एकूण 60 सामने होणार
प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या पर्वामध्‍ये गतविजेते 'जयपूर पिंक पँथर' पहिल्याच सामन्यात उपविजेत्या मुंबईला भिडणार आहे. 21 ऑगस्टला होणार्‍या सेमीफायनलचे यजमानपद मुंबई भूषवणार आहे. आठ शहरांमध्ये 37 दिवसांमध्ये एकूण 60 सामने खेळले जाणार आहेत.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करून पाहा, बिग बी यांचे गी‍‍त गातानाचा फोटो..