आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Amitabh Bachchan To Sing National Anthem At Pro Kabbadi Opening Ceremony

प्रो कबड्डी : उद्घाटन सोहळ्यात बिग बीचे राष्‍ट्रगीत गायन, आमिर, अभिषेकसह मुख्‍यमंत्र्यांची उपस्‍थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रो कबड्डी स्पर्धेच्‍या उद्घाटन समारंभात अमिताभ बच्‍च्‍ान आणि मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस. - Divya Marathi
प्रो कबड्डी स्पर्धेच्‍या उद्घाटन समारंभात अमिताभ बच्‍च्‍ान आणि मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांनी प्रो कबड्डी स्‍पर्धेच्‍या उद्घाटन सोहळ्यात राष्‍ट्रगीताचे गायन केले.  स्‍पर्धेच्‍या प्रचाराचे गीतही त्‍यांनी यावेळी म्‍हटले. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री जया बच्‍चन, श्‍वेता नंदा, अभिनेता अामिर खान आणि मुंबई टीमचा मालक अभिषेक बच्‍चन यांची या कार्यक्रमाला प्रामुख्‍याने उपस्‍थिती होती.
 
अमिताभ यांनी यापूर्वी ब्‍लाॅगवरून नियोजित कार्यक्रमाची माहिती दिली होती. त्‍यांनी लिहीले होते की, ‘शनिवारच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रगीत गाण्यासाठी मला सांगण्यात आले आहे. या स्पर्धेमध्‍ये सर्व नामवंत पाहुणे, गायक मंडळी व संगीतकारांसोबत थेट गाता येणार आहे.  राष्ट्रीयत्वाची ओळख करून देणार्‍या या क्षणाचा मी  घटक होणार आहे, ही भाग्याची बाब आहे.’
 
8 संघ 60 सामने
प्रो कबड्डी स्पर्धेमध्‍ये आठ वेगवेगळ्या शहरातील संघांमध्‍ये एकूण 60 सामने खेळल्‍या जाणार आहेत.  दररोज सायंकाळी 8 वाजता दोन सामने होतील. यामध्‍ये 56 लीग , दाने उपांत्‍य सामने, तीस-या आणि चौथ्‍या स्थानावरील संघासाठी एक सामना अाणि अंतिम सामना होणार आहे.  
 
मागील वर्षी  43 कोटींवर होते दर्शक
प्रो कबड्डी स्‍पर्धेची  2014 मधील पहिली मालिका चांगलीच गाजली. आयपीएलनंतर दुस-या क्रमांकावर दर्शकांची पसंती मिळवणारी ही स्‍पर्धा ठरली. मागील वर्षी पहिल्‍याच आठवड्यात स्‍पर्धेचे दर्शक 43 कोटी 50 लाख एवढे होते. तर, आयपीएलच्‍या दर्शकांची संख्‍या 55 कोटी 20 लाख होती.  
 
जागतिक दर्शक केंद्रस्‍थानी
जागतिक स्‍तरावरील दर्शकांना आकर्षित करण्‍यासाठी स्‍टार स्‍पोटर्स ही वाहिनी कबड्डी खेळणा-या 34 देशांच्‍या संपर्कात आहे. ज्‍या देशातील लोकांमध्‍ये कबड्डी विषयी आवड निर्माण केली जाऊ शकते अशा 15 ते 16 इतर देशांसोबतही वाहिनीने संपर्क केला अाहे. स्टार स्पोर्ट्स आपले चॅनल दोन, तीन, एचडी दोन, एचडी तीन आणि हॉट स्‍टारवर या सामन्‍याचे प्रसारण करणार आहे.  प्रसारण इंग्रजी, हिन्दी, तेलगू, कन्नड आणि मराठी भाषेत होणार आहे.
 
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, उद्घाटन सोहळ्यातील काही खास फोटो..