आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Andi Murrey, Serena, Sania Won Their Matches In Wimbledon

Wimbledon अँडी मरे तिसऱ्या फेरीत, सेरेना, वावरिंका, वोज्नियाकीची आगेकूच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - जागतिक क्रमवारीतील तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू इंग्लंडच्या अँडी मरेने विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. त्याने दुसऱ्या फेरीच्या सामन्यात हॉलंडच्या रॉबिन हॅसला हरवले. याशिवाय चौथ्या क्रमांकाचा खेळाडू स्टॅन वावरिंका आणि महिला गटातील नंबर वन खेळाडू अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स यांनीही आगेकूच केली आहे. महिला दुहेरीत भारताची सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस जोडीने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत बेथानी माटेकने सनसनाटी विजयासह पहिल्याच फेरीतून माजी नंबर वन अॅना इव्हानाेविकला बाहेरचा रस्ता दाखवला.

इंग्लंडच्या अँडी मरेने दुसऱ्या फेरीचा सामना १ तास आणि २७ मिनिटांत ६-१, ६-१, ६-४ ने सहजपणे जिंकला. त्याने या सामन्यात ५ तर हॅसने एकच ऐस मारला. मरेने विरोधी खेळाडूच्या १९ च्या तुलनेत तब्बल २६ विनर्स मारुन सामना एकतर्फी केला. हॅसने सामन्यात तब्बल ६ डबल फॉल्ट केले. याचा फटका त्याला बसला.
पाच वेळची विम्बल्डन चॅम्पियन सेरेनाने महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत एकतर्फी विजयाची नाेंद केली. तिने हंगेरीच्या टिमेया बाबाेसचा पराभव केला. अव्वल मानांकित सेरेनाने अवघ्या ५९ मिनिटांमध्ये ६-४, ६-१ अशा फरकाने सामना अापल्या नावे केला. जागतिक क्रमवारीत ९३ व्या स्थानावर असलेल्या टिमेयाने अव्वल मानांकित सेरेनाला राेखण्याचा प्रयत्न केला. मात्र, या वेळी तिचा प्रयत्न थिटा पडला. अमेरिकेच्या ३३ वर्षीय खेळाडूने सरस खेळी करताना १२ एेस अाणि २३ विनर्सच्या बळावर शानदार विजय साकारला. यंदाच्या सत्रात तिसऱ्या ग्रॅॅण्डस्लॅमचा किताब पटकावण्याच्या इराद्याने सेरेना अागेकूच करत अाहे. त्यासाठी तिने पहिल्या फेरीपासून दमदार विजयाने अापल्या माेहिमेचा शुभारंभ केला. अाता सेरेनाचा तिसऱ्या फेरीतील सामना इंग्लंडच्या हिथर वाॅटसनशी हाेईल.

अॅना इव्हानाेविकचा पराभव
जगातील माजी नंबर वन अॅना इव्हानाेविकसाठी स्पर्धेतील अापला पहिला दिवस कटू ठरला. तिला महिला एकेरीच्या पहिल्याच फेरीत अनपेक्षितपणे पराभवाला सामाेरे जावे लागले. बेथानी माटेक-सॅण्डने सर्बियाच्या अॅनावर ६-३, ६-४ अशा फरकाने विजय मिळवला.

कॅराेलिना वाेज्नियाकीची अागेकूच
जगातील माजी नंबर वन कॅराेलिना वाेज्नियाकीने महिला एकेरीची तिसरी फेरी गाठली. तिने दुसऱ्या फेरीतील सामन्यात राेमहर्षक विजयाची नाेंद केली. पाेलंडच्या वाेज्नियाकीने डेनिसा अल्लेर्टाेवावर ६-१, ७-६ ने मात केली. अाता तिसऱ्या फेरीत २४ वर्षीय वाेज्नियाकी अाणि ३१ वी मानांकित कॅमिला जाॅर्जिया समाेरासमाेर असतील.

लिसिकी तिसऱ्या फेरीत
महिला गटात जर्मनीच्या एस. लिसिकीने अमेरिकेच्या सी. मॅकहाले हिला २-६, ७-५, ६-१ ने हरवत तिसरी फेरी गाठली.

सानिया-हिंगीसची आगेकूच
भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झाने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरी जिंकण्याच्या अापल्या माेहिमेला गुरुवारी दमदार सुरुवात केली. तिने अापली सहकारी मार्टिना हिंगीससाेबत स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. अव्वल मानांकित सानिया-मार्टिनाने अवघ्या ६९ मिनिटांमध्ये सलामीचा सामना जिंकला. या जाेडीने डियास अाणि झेंगला धूळ चारली. अव्वल मानांकित जाेडीने ६-२, ६-२ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. यासह त्यांनी महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली. अाता या जाेडीचा दुसऱ्या फेरीतील सामना किमिकाे डाते-क्रुम अाणि फ्रान्सेस्काशी हाेणार अाहे.

उन्हाचा विक्रमी पारा
विम्बल्डन टेनिस स्पर्धेदरम्यान अव्वल खेळाडू सध्या कडक उन्हाच्या तडाक्यामुळे चांगलेच त्रस्त अाहेत. गुरुवारी या ठिकाणी उन्हाचा पारा विक्रमी ३५.०७ अंश सेल्सियस असा हाेता. मात्र, कडक उन्हातही खेळाडू स्वत: ला सावरत विजयाची नाेंद करताना दिसत अाहेत.