आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Russian Andrew Rodiche Climbs Mountain With Barbel

SHOCKING: याने 75 किलो वजन घेऊन गाठले सर्वोच्‍च शिखर, केला विश्‍व विक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मरमान्कस (रशिया) - युरोपमधील माउंट एलबर्स या सर्वोच्‍च (5642 मीटर) शिखरावर आजपर्यंत अनेक गिर्यारोहक चढले आहेत. पण रशियाचा पॉवर लिफ्टर अॅन्‍ड्रे रोडिखेव याने अनोखा साहसी प्रयोग केला आहे. त्‍याने 75 किलो वजन उचलून हे सर्वोच्‍च शिखर गाठले व जागतिक विक्रम केला. जेवढे वजन उचलून लोक जीममध्‍ये व्‍यायाम करतात तेवढेच वजन घेऊन शिखर गाठणे म्‍हणजे सोपी बाब नव्‍हे.
असा केला सराव
हा विक्रम नावावर करण्‍यासाठी अॅन्‍ड्रेला प्रचंड मेहनत घ्‍यावी लागली. दररोज सकाळी तो सराव करत होता. आधी त्‍याने 10 किलो वजन खांद्यावर घेऊन धावण्‍यास सुरूवात केली. पुढे-पुढे तो वजन वाढवत गेला. शेवटी 75 किलो वजन खांद्यावर उचलून त्‍याने सर्वोच्‍च शिखर गाठले.
तो प्रतितास 50 मीटर चालला
हा प्रवास पुर्ण करण्‍यासाठी अॅन्‍ड्रेला 8 दिवस लागले. प्रतितास 50 मीटर या वेगात तो शिखरावर चढला. रस्‍त्‍यांमधील चढ उतारामुळे त्‍याचा वेग प्रतितास 15 मीटरही राहिला आहे. 6 सप्‍टेंबरला त्‍याने हा प्रवास पुर्ण करून गिर्यारोहकांचे लक्ष वेधले आहे. शेवटच्‍या टप्‍प्यात वातावरण खराब होते, पण त्‍याने हार मानली नाही.
पुढील स्‍लाईड्सवर क्‍लिक करून पाहा, 75 किलो वजन घेऊन अॅन्‍ड्रेने कसे गाठले शिखर..