आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांघाय मास्टर्स टेनिस: वावरिंका, त्साेंगा बाहेर; याेकाेविक उपांत्य फेरीत, जर्मनीचा झेवेरेव पराभूत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शांघाय - जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविकने शुक्रवारी शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. त्याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीच्या मिस्चा झेवेरेवचा पराभव केला. त्याने ३-६, ७-६, ६-३ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह त्याने अंतिम चारमधील अापला प्रवेश निश्चित केला. या विजयाच्या बळावर त्याने यंदाच्या स्पर्धेत किताबाचा अापला दावा मजबूत केला. त्यानंतर त्याने तिसऱ्या अाणि निर्णायक सेटमध्येही बाजी मारून सामना अापल्या नावे केला.
तिसऱ्या मानांकित वावरिंका व नवव्या मानांकित त्साेंगाला पॅकअप करावे लागले. उपांत्यपूर्व सामन्यात १५ व्या मानांकित बाऊतिस्टाने त्साेंगाला पराभूत केले. त्याने ६-३, ६-४ ने सामना जिंकला. त्यानंतर बिगरमानांकित सिमाेनने सामन्यात वावरिंकाचा पराभव केला. त्याने ६-४, ६-४ असा एकतर्फी विजय संपादन केला.
बातम्या आणखी आहेत...