आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन मरेचा क्वार्टर फायनलमध्ये पराभव, नंबर वनचे सिंहासनही धोक्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अँडी मरे - Divya Marathi
अँडी मरे
लंडन  - गतचॅम्पियन इंग्लंडचा अँडी मरेचा विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये पराभव झाला आहे. जगातला नंबर वन खेळाडू मरेला २४ वा मानांकित अमेरिकेच्या सॅम क्वेरीने पाच सेटपर्यंत रंगलेल्या संघर्षमय सामन्यात ३-६, ६-४, ६-७, ६-१, ६-१ ने हरवले. सुरुवातीच्या तीनपैकी दोन सेट जिंकून मरे चांगल्या स्थितीत होता. मात्र, अखेरच्या १४ पैकी १२ गेम जिंकून क्वेरीने स्पर्धेतील सर्वांत मोठा धक्कादायक विजय मिळवला. हा सामना २ तास आणि ४२ मिनिटे चालला. प्री क्वार्टर फायनलमध्ये फ्रेंच ओपन चॅम्पियन स्पेनच्या राफेल नदालला हरवून सनसनाटी विजय मिळवणारा लक्जमबर्गचा जाईल्स म्युलरही स्पर्धेबाहेर झाला आहे. म्युलरला पाच सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात सातवा मानांकित क्रोएशियाच्या मरीन सिलिचने ३-६, ७-६, ७-५, ५-७, ६-१ ने मात दिली. सेमीफायनलमध्ये क्वेरीचा सामना सिलिचशी होईल.   
 
या पराभवामुळे मरेचे वर्ल्ड नंबर-१ चे मुकुट संकटात सापडले आहे. जागतिक क्रमवारीतील नंबर दोनचा खेळाडू सर्बियाचा नोवाक योकोविकने किताब जिंकला तर तो मरेकडून नंबर-१ चे सिंहासन हिसकावून स्वत:च्या नावे करू शकतो. इतर एका क्वार्टर फायनलमध्ये योकोविकचा सामना टॉमस बर्डिचशी होईल. मरे आणि क्वेरी यांच्यात हा आतापर्यंतचा नववा सामना होता. यात फक्त दुसऱ्यांदा मरेचा पराभव झाला आहे. क्वेरीने सामन्यात ७० विनर्स मारले आणि  यातील ३० विनर्स तर त्याने नेटवर मारले. मरे सामन्याच्या वेळी दुखापतीने त्रस्त वाटत होता. हेच त्याच्या पराभवाचे कारणही ठरले.
बातम्या आणखी आहेत...