आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

याेकाेविकला पुन्हा धक्का; मरेचा ..हिप..हिप..हुर्रे.. !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - जगातील नंबर वन अँडी मरेने अवघ्या अाठवडाभरात सलग दुसऱ्यांदा माजी नंबर वन नाेवाक याेकाेविकला पराभवाची धूळ चारली. त्याने या सनसनाटी विजयाच्या बळावर साेमवारी एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. इंग्लंडच्या मरेने पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये सर्बियाच्या याेकाेविकवर सरळ दाेन सेटमध्ये विजय मिळवला. त्याने ६-३, ६-४ अशा फरकाने शानदार एकतर्फी विजय साकारला. यापूर्वी मरेने पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेतही सर्बियाच्या याेकाेविकचा पराभव केला हाेता. त्यानंतर पुन्हा दाेन्ही टेनिसस्टार समाेरासमाेर अाले हाेते.

नंबर वनच्या स्थानामुळे अात्मविश्वास बुलंदीवर असलेल्या मरेने फायनलमध्ये एकहाती विजय खेचून अाणला. त्याने दमदार खेळी करताना सहज पहिला सेट जिंकला. यासह त्याला लढतीमध्ये अाघाडी मिळवली.
बातम्या आणखी आहेत...