आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अँडी मरे दुसऱ्यांदा आॅलिम्पिक चॅम्पियन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिआे दि जानेरिआे - इंग्लंडचा टेनिसपटू अँडी मरे हा आॅलिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन ठरला. त्याने सलग दुसऱ्यांदा आॅलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. त्याने रिआे आॅलिम्पिक स्पर्धेत पुरुष एकेरीचा किताब आपल्या नावे केला.

मरेने एकेरीच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पेत्राेला पराभूत केले. त्याने रंगतदार सामना ७-५, ४-६, ६-२, ७-५ अशा फरकाने जिंकला. यासह त्याला एकेरीचे जेतेपदावर नाव काेरता आले. त्याचे हे दुसरे आॅलिम्पिक सुवर्णपदक ठरले. यापूर्वी त्याने २०१२ च्या लंडन आॅलिम्पिक स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले हाेते.

शर्थीची झंुज देणारा २००९ चा अमेरिकन आेपन चॅम्पियन डेल पेत्राे उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. त्याने चार सेटपर्यंत मरेला राेखण्यासाठी जिवाचे रान केले. मात्र, यात इंग्लंडचा मरे सरस ठरला. डेल पेत्राेने अव्वल कामगिरी करताना जगातील नाेवाक याेकाेविकला पराभूत करून पुढच्या फेरीत प्रवेश केला हाेता. मात्र, त्याला अंतिम फेरीत आपले आव्हान कायम ठेवता आले नाही.

विम्बल्डनचा किताब जिंकल्याने आत्मविश्वास द्विगुणित असलेल्या मरेने रिआे आॅलिम्पिक स्पर्धेत सरस खेळी करत फायनलचा पल्ला यशस्वीपणे गाठला हाेता. याशिवाय त्याने अंतिम सामन्यात बाजी मारून आपले जेतेपदावरचे आव्हान कायम ठेवले. मात्र, यासाठी त्याला चार सेटपर्यंत अर्जेंटिनाच्या खेळाडूने झुंजवले.

दमदार सुरुवात करण्याचा मरेचा प्रयत्न अपयशी ठरला. डेल पेत्राेने आक्रमक खेळी केल्यामुळे पहिला सेट ट्रायबेकरपर्यंत खेचला गेला. मात्र, यात सरस खेळी करून मरेने बाजी मारली. यासह त्याला सामन्यात आघाडी मिळाली. मात्र, ही आघाडीही त्याला टिकवता आली नाही.

व्हीनस-राजीव रामला उपविजेतेपद
भारताच्या सानिया मिर्झा आणि राेहन बाेपन्नाला पराभूत करून आगेकूच करणाऱ्या व्हीनस-राजीव रामला मिश्र दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या जाेडीला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. जाॅन साॅक आणि बेथानी माटेकने अंतिम सामन्यात व्हीनस-राजीव रामचा २-१ ने पराभव केला. यासह त्यांनी मिश्र दुहेरीच्या किताबावर नाव काेरले.
बातम्या आणखी आहेत...