आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांघाय मास्टर्स टेनिस; अँडी मरेने पटकावला किताब, स्पेनचा बाऊस्टा उपविजेता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शांघाय - जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या अँडी मरेने किताब पटकावला. त्याने रविवारी शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेत पुुरुष एकेरीचे विजेतेपद अापल्या नावे केले. त्याने एकेरीच्या फायनलमध्ये स्पेनच्या बाउस्टाचा पराभव केला.

इंग्लंडच्या मरेने ७-६, ६-१ अशा फरकाने शानदार विजय संपादन केला. यासह त्याने अजिंक्यपदावर नाव काेरले. जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविकचा पराभव करणाऱ्या बाऊस्टाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजयासाठी त्याने केलेला प्रयत्न अपुरा ठरला. त्यामुळे त्याला पराभवाचा सामना करावा लागला. त्याने उपांत्य सामन्यात याेकाेविकवर मात करून किताबाचा अापला दावा मजबुत केला हाेता. मात्र,त्याला मरेला राेखता अाले नाही.
इंग्लंडच्या मरेने सरस खेळी करताना शानदार विजय साकारला. यासाठी त्याला पहिल्या सेटवर शर्थीची झंुज द्यावी लागली. मात्र, यात बाजी मारून त्याने अाघाडी मिळवली. त्यानंतर त्याने दुसरा सेट जिंकून सामना अापल्या नावे केला.

इन्सर-साॅकला दुहेरीचे जेतेपद
ब्रायन बंधूंना पॅकअप करण्यास भाग पाडणाऱ्या जाॅन इन्सर अाणि जाॅन साॅकने पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावले. या जाेडीने फायनलमध्ये काेटीनेन अाणि जाॅन पियर्सचा पराभव केला. त्यांनी ६-४, ६-४ ने एकतर्फी विजय साकारला.
बातम्या आणखी आहेत...