आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ankita Raina In Semifinals Of Womens ITF Championship

महिला आयटीएफ अजिंक्यपद : अंकिता रैना, प्रेरणा, तादेजा माजेरिक उपांत्यपूर्व फेरीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एंड्युरन्स एमएसएलटीए मराठवाडा टेनिस सेंटरतर्फे (ईएमएमटीसी) आयोजित २५ हजार डॉलर एंड्युरन्स महिला आयटीएफ अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या फेरीत भारतीय खेळाडू अंकिता रैना, प्रेरणा भांब्री, प्रांजला येडलापल्लीसह तादेजा माजेरिक, चिंग- वेन सू या विदेशी खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुहेरी गटात अंकिता रैनाला पराभवाचा धक्का बसला.

विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरी गटात दोन तास चाललेल्या रोमांचक लढतीत भारताची अव्वल खेळाडू आणि स्पर्धेतील पाचवी मानांकित अंकिता रैना हिने स्नेहादेवी एस. रेड्डीचा ६-०, ७-६ (७) असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. युवा खेळाडू प्रेरणा भांब्रीने ध्रुती वेणुगोपालचा ६-२, ५-७, ६-१ ने पराभूत कले. प्रांजला येडलापल्लीने रिशिका सनकाराचा ६-४, ६-२ पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्लोव्हाकियाच्या दुसऱ्या मानांकित तादेजा माजेरिक तैपेईच्या ली ची पी हिला ६-०, ०-६, ६-० ने संघर्षपूर्ण लढतीत हरवले.

दुहेरी गटात रिया भाटिया आणि स्नेहादेवी एस. रेड्डी जोडीने मिकी मियामुरा व अंकिता रैना या जोडीचा ७-५, ७-५ असा पराभव केला. मार्गरिटा लाझावेरा आणि व्हेलेरिया स्ट्राखोवा जोडीने अम्रिता मुखर्जी आणि स्नेहा पदमता जोडीचा ६-०, ६-२ असा पराभव करून दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

इतर निकाल
एकेरी गट : व्हेलेरिया स्ट्राखोवा (१) वि. वि मार्गारिटा लाझावेरा ६-१, ६-२, चिंग- वेन सू(८) वि. वि निचा लेर्तपिताकसिंचाय ६-२, ६-१, एकातेरिना याशिना वि. वि नुग्निदा लुंआन्गाम (६) ६-१, २-६, ६-३, लोऊ ब्रोउली (७) वि. वि रिया भाटिया ६-२, ६-३, प्रांजला येडलापल्ली वि.वि रिशिका सनकारा ६-४, ६-२.

दुहेरी गट : मेलिस सेझेर व एकातेरिना याशिना वि. वि. सौजन्या बावीसेट्टी व कामिला करिंबयेवा ३-६, ६-४, १०-५, चिंग- वेन सू व अयाका ओकुनो वि. वि. निधी चिलुमुला व पी-ची ली ६-७ (८) ६-२, १०-१, मार्गारिटा लाझावेरा व व्हेलेरिया स्ट्राखोवा वि.वि. अम्रिता मुखर्जी व स्नेहा पदमता ६-०, ६-२, रिया भाटिया व स्नेहादेवी एस. रेड्डी वि. वि. मिकी मियामुरा व अंकिता रैना ७-५, ७-५,