आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ankita Raina Lost In Womens ITF Tennis Tournament

महिला आयटीएफ टेनिस : प्रांजला उपांत्य फेरीत; अंकिता रैनाचे पॅकअप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एन्ड्युरन्स एमएसएलटीए मराठवाडा टेनिस सेंटरतर्फे आयोजित २५ हजार डॉलर महिला आयटीएफ अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश मिळवणाऱ्या प्रांजला येडलापल्लीने सनसनाटी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

विभागीय क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत कुमार गटात जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानावर असलेल्या हैदराबादच्या प्रांजलाने सातव्या मानांकित फ्रान्सच्या लु ब्राउलीचा ६-४, ४-६, ६-२ अशा तीन सेटपर्यंत रंगलेल्या संघर्षपूर्ण लढतीत पराभव केला. प्रांजलाने २ तास ३० मिनिटांत ही लढत जिंकली. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे मी ब्राउलीवर मात करू शकले, याचा आनंद आहे, असे विजयानंतर प्रांजलाने प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या लढतीत रशियाच्या इक्तारिना याशिना हिने भारताची राष्ट्रीय चॅम्पियन प्रेरणा भांब्रीला ७-६ (३), ६-३ ने हरवले. दुहेरीच्या उपांत्य फेरीत मेलिस सेझर व याशिना इक्तारिना जोडीने रिया भाटिया व स्नेहादेवी रेड्डी या भारतीय जोडीचा ६-१, ६-४ ने पराभव केला. दुसरीकडे मार्गारिटा लझरेवा व वेलरिया स्त्रकोवा जोडीने चिंग वेन सू आणि अयाका ओकुनो यांना टायब्रेकरमध्ये ६-७ (५), ६-०, ११-९ ने नमवले.

तडेजा मॅजरिकची अंकितावर मात
विजेतेपदाची दावेदार भारताची अव्वल खेळाडू अंकिता रैनाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. स्पर्धेतील दुसऱ्या मानांकित स्लोव्हाकियाच्या तडेजा मॅजरिक हिने पाचव्या मानांकित अंकिता रैनाला अंत्यत चुरशीच्या लढतीत ७-६ (५), ४-६, ६-२ ने पराभूत करत एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

इतर निकाल
वेलरिया स्त्रकोवा, युक्रेन वि.वि. चिंग वेन सू, तैपेई ४-६, ६-३, ६-१, इक्तारिना याशिना, रशिया वि.वि. प्रेरणा भांब्री, भारत ७-६ ३, ६-३, प्रांजला येडलापल्ली, भारत वि.वि. लु ब्राउली, फ्रान्स ६-४, ४-६, ६-२, तडेजा मॅरिक, स्लोवाकिया वि.वि. अंिकता रैना, भारत ७-६ (५).