आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

800 मीटर चॅम्प अर्चनाला 1500 मी. मध्ये सुवर्ण, राष्ट्रीय अाेपन अॅथलेटिक्स स्पर्धेत अव्वल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - अकाेल्याची प्रतिभावंत युवा धावपटू अर्चना  अाढावने मंगळवारी चेन्नईतील ५७ व्या राष्ट्रीय खुल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत साेनेरी यशाचा पल्ला गाठला. ८०० मीटरची ज्युनियर एशियन चॅम्पियन असलेल्या या धावपटूने १५०० मीटरमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. तिने पहिल्यांदाच या लांब पल्ल्याच्या गटात धावण्याचा निर्णय घेतला अाणि प्रचंड मेहनतीच्या बळावर तिने पदार्पणातच साेनेरी यश खेचून अाणले.   

अर्चनाने चेन्नईतील राष्ट्रीय स्पर्धेतील महिलांची १५०० मीटरची शर्यत जिंकली. तिने ४ मिनिटे १८.६४ सेकंदांमध्ये निश्चित अंतर पूर्ण केले. यासह ती सुवर्णपदकाची मानकरी ठरली. यादरम्यान तिने रेल्वेच्या माेनिका चाैधरी अाणि रमिला यादवला पिछाडीवर टाकले. तिचे या स्पर्धेतील हे पहिलेच सुवर्णपदक ठरले.  रेल्वेच्या माेनिकाला राैप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिने ४ मिनिटे १९.१५ सेकंदांमध्ये हे अंतर पूर्ण केले. रमिला कांस्यपदकाची मानकरी ठरली. तिने ४ मिनिटे २७.३९ सेकंदांमध्ये ही शर्यत पूर्ण केली.

अर्चना १०० मीटरमध्ये अव्वल :
तामिळनाडूची अर्चना ही १०० मीटरमध्ये चॅम्पियन ठरली. तिने  शर्यत ११.७८ सेकंदांमध्ये पुर्ण केली. यात चंद्र लेखाला राैप्यपदकावर समाधान मानावे लागले.
 
काेच निकाेलसचा विश्वास सार्थकी
राष्ट्रीय अॅथलेटिक्स संघाचे प्रशिक्षक निकाेलस यांनी अर्चनाला अाता नव्याने १५०० मीटरच्या गटात नशीब अाजमावण्याचा सल्ला दिला. तसेच त्यासाठीचे खास मार्गदर्शनही केले. त्यामुळे त्यांनी दाखवलेल्या या विश्वासाला सार्थकी लावताना तिने सुवर्णपदकाची कमाई केली. तिने पदार्पणात मिळवलेले यश उल्लेखनीय ठरले. अर्चना सध्या पतियाळा येथे  अागामी अांतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करत अाहे.  
 
दाेन गटांत चॅम्पियन हाेण्याची माेठी संधी
युवा धावपटू अर्चना अापल्या कामगिरीचा दर्जा उंचावताना साेनेरी यशाला गवसणी घालत अाहे. तिचे हे यश निश्चित वाखाणण्याजाेगे अाहे. अाता लवकरच ती अांतरराष्ट्रीय स्पर्धेत दाेन गटांत चॅम्पियन हाेऊ शकेल. यासाठीची क्षमताही तिच्यात अाहे. त्यामुळे अागामी स्पर्धेत दुहेरी साेनेरी यश ती सहजरीत्या संपादन करू शकणार अाहेे.  
-सुरेश काकड, प्रशिक्षक
बातम्या आणखी आहेत...