आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपा अमेरिका : चिली फायनलमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिकागो - गतविजेता चिलीने पहिल्या हाफमध्ये केलेल्या दोन गोलच्या बळावर सेमीफायनलमध्ये कोलंबियाला २-० ने पराभूत करून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फायनलमध्ये रविवारी अर्जेंटिना-चिली लढत होईल. याआधी अर्जेंटिनाने अमेरिकेला ४-० ने नमवत फायनल गाठली होती. चिली आणि अर्जेंटिना सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये लढणार आहेत.

गतचॅम्पियन चिलीने क्वार्टर फायनलमध्ये मेक्सिकोला ७-० ने हरवत सेमीत थाटात प्रवेश केला होता. सेमीत कोलंबियाविरुद्ध सातव्या मिनिटालाच गोल केला. मिडफील्डर कुआड्राडोने हेडरने चेंडूला एरानगुएजकडे पोहोचवले हाेते.
बातम्या आणखी आहेत...