आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपा अमेरिका : मेसीच्या अर्जेंटिनापुढे आज चिलीचे आव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये रविवारी अर्जेंटिनासमोर चिलीचे मजबूत आव्हान असेल. या वेळी अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू लियोनेल मेसीकडे जगभरातील चाहत्यांचे लक्ष असेल. पाच वेळेसचा सर्वश्रेष्ठ फुटबॉलर ऑफ द इयरचा मानकरी ठरलेल्या मेसीची कारकीर्द इतकी चमकदार राहिली आहे की त्याची तुलना पेले किंवा दिएगो मॅरेडोनाशी होऊ शकते. मात्र, तो अर्जेंटिनाला अद्याप एकाही मोठ्या स्पर्धेत विजय मिळवून देऊ शकलेला नाही. रविवारी त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. अर्जेंटिना ईस्ट रुदरफोर्डच्या मेटलाइफ स्टेडियममध्ये ८१ हजार प्रेक्षकांसमोर कोपा अमेरिकेच्या फायनलमध्ये चिलीशी लढेल त्या वेळी मेसीच सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल. सेमीफायनलमध्ये अर्जेंटिनाने यजमान अमेरिकाला ४-० ने हरवले होते. या सामन्यात मेसीने दबावमुक्त होऊन खेळ केल्याचे सर्वांनी पाहिले.

मेसी आणि त्याच्या सहकाऱ्यांसाठी हे तीन वर्षांत तिसरे फायनल असेल. त्यांना विश्वचषक २०१४ च्या फायनलमध्ये जर्मनीकडून आणि मागच्या वर्षी कोपा अमेरिकाच्या फायनलमध्ये चिलीकडूनच पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर मेसीवर जोरदार टीका झाली होती.

..तर परत येऊ नका
आम्हाला रविवारी फायनलमध्ये कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. फायनल जिंकलो नाही तर त्यांनी परत येऊ नये.’ - मॅरेडोना, अर्जेंटिनाचा माजी खेळाडू.

मेसीला विक्रमाची संधी
मागच्या सामन्यात मेसीने फ्री किकवर गोल करून अर्जेंटिनाकडून सर्वाधिक ५४ करण्याच्या गॅब्रियल बतिस्तुताच्या विक्रमाची बरोबरी केली. फायनलमध्ये गोल करून मेसी हा विक्रम मोडू शकतो.
बातम्या आणखी आहेत...