आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Argentina Won Against Paraguay In Copa America Cup

कोपा अमेरिका चषक : मेसीमुळे अर्जेंटिना अंितम फेरीत, पॅराग्वेचा ६-१ ने खुर्दा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काॅन्सेप्सिआॅन (चिली) - लियोनेल मेसीच्या झंझावाती वैयक्तिक कामगिरीमुळे कोपा अमेरिका चषक फुटबाॅल स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात अर्जेंटिनाने पॅराग्वेला शरणागती पत्करायला भाग पाडून त्यांचा ६-१ गोलने खुर्दा केला. परिणामी स्पर्धेतील जेतेपदाचा दावेदार अर्जेंटिना अंतिम फेरीत धडकला. त्यांना जेतेपदासाठी शनिवारी चिलीविरुद्ध झुंजावे लागणार आहे.

अर्जेंटिनाकडून मध्यंतरापूर्वी मँचेस्टर युनायटेडचा डिफेंडर रोजो आणि पॅरिस सेंट जर्मेन्सच्या पास्टोरने दोन सुरेख गोल नोंदवून आघाडी मिळवून दिली. १५ व्या मिनिटाला मेसीची फ्री किक रोजोकडे गेल्यानंतर त्याने खालूनच चेंडू गोलमध्ये धाडला. त्यानंतर २१ व्या मिनिटाला पॅराग्वेचा खेळाडूंना चकमा देत पास्टोरकडे चेंडू सोपवला. त्याने गोलचा वेध घेण्यात कोणतीही चूक केली नाही. या सामन्यात बहुतेक गोलचे व्यूहरचना मेसीनेच केली होती.

मेसीला नाही गवसला १० सामन्यांत सूर
बार्सिलोना क्लबचा सुपरस्टार लियोनेल मेसीला ९०० मिनिटे अर्थात १० सामन्यांनंतरही आंतरराष्ट्रीय फुटबाॅलमध्ये गोल नोंदवता आला नाही. एक मात्र खरे की, त्याने ज्या योजना आखून दिल्या त्या अशा काही बेमालूम होत्या की, त्याचा लाभ इतर संघसहकाऱ्यांना िमळाला. जरी मेसीला गोल करता आला नाही तरी तोच या सामन्यात चमकला.

मारियाचे दोन गोल
अर्जेंटिनाचा स्ट्रायकर अँजेल डी मारियाने या सामन्यात दोन गोलची नोंद केली, तर मार्कोस रोजो, झेव्हियर पास्टोर, सर्गिओ अॅग्युएरो आणि गोझालेझ हिग्युएनने प्रत्येकी एक गोल ठोकून संघाला विजयी केले. सामन्यात पॅराग्वेचे अर्जेंटिनाच्या फाॅवर्ड लाइनपुढे चालले नाही. त्यांचा बहुतेक वेळ बचावातच गेला.