आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॉकी : अर्जेंटिना टीम अाॅलिम्पिक चॅम्पियन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअाे दि जानेरिओ - अर्जेंटिना पुरुष हाॅकी संघ रिअाेत अाॅलिम्पिक चॅम्पियन ठरला. या संघाने फायनलमध्ये बेल्जियमचा पराभव केला. अर्जेंटिनाने ४-२ अशा फरकाने सामना जिंकला. यासह अर्जेंटिना संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. इबरा पेड्राे (१२ मि.), अाेट्रीझ इगासिअाे (१५ मि.), पेल्लीट गाेंझालाे (२१ मि.) अाणि अॅगस्टिन (५९ मि.) यांनी केलेल्या गाेलच्या बळावर अर्जेंटिनाने सामना जिंकला. दुसरीकडे काेसी (२ मि.) अाणि गाऊथर (४४ मि.) यांनी केलेली कामगिरी अपयशी ठरली. या पराभवामुळे बेल्जियमला राैप्यपदकावर समाधान मानावे लागले. गत अाॅलिम्पिक चॅम्पियन जर्मनीला धूळ चारून अर्जेंटिनाने फायनलमध्ये धडक मारली हाेती.

किताबाच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या बेल्जियमने सामन्यात अवघ्या २ मिनिटांत गाेलचे खाते उघडले. काेसीने संघाला १-० ने अाघाडी मिळवून दिली. मात्र, अर्जेंटिनाने ९ मिनिटांत सामन्यात बराेबरी साधली. इबरा पेड्राेने अर्जेंटिनाकडून पहिल्या गाेलची नाेंद करताना बराेबरी साधण्यात यश मिळवले. त्यानंतर इगासिअाेने ३ मिनिटांत संघाला २-१ ने अाघाडी मिळवून दिली हाेती.

गतविजेत्या जर्मनी संघाला कांस्यपदक
गत सुवर्णपदक विजेत्या जर्मनी संघाला रिअाे अाॅलिम्पिकमध्ये कांस्यवर समाधान मानावे लागले. जर्मनीने तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत हाॅलंडचा पराभव केला. जर्मनीने ४-३ ने पेनॅाल्टी शूटअाऊटमध्ये सामना जिंकला. निर्धारित वेळेपर्यंत ही लढत १-१ ने बराेबरीत राहिली हाेती.
बातम्या आणखी आहेत...