आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जेंंटिनाला जिंकवू शकला नाही म्हणून मेस्सी निवृत्त! पाच वेळा ठरला आहे सर्वश्रेष्ठ खेळाडू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईस्ट रदरफोर्ड- आजघडीला जगातला सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू असलेला अर्जेंटिनाचा लियोनेल मेसीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे. क्लब फुटबॉलमध्ये बार्सिलोनाला सर्व किताब जिंकून देणारा हा दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा अर्जेंटिनाला चॅम्पियन बनवण्यात अपयशी ठरला. देशासाठी महत्त्वाच्या सामन्यात चांगले प्रदर्शन करू शकत नसल्याचा दबाव त्याच्यावर वरचढ ठरला. चिलीविरुद्ध कोपा अमेरिकाच्या फायनलमध्ये पेनल्टी शूटआऊटमध्ये त्याचा शॉट क्रॉसबारच्या वरून बाहेर गेला. अर्जेंटिनाचा २-४ ने पराभव झाला आणि काही मिनिटांनंतर मेसीने निवृत्तीची घोषणा केली. २००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अर्जेंटिनाची जर्सी घालून सुवर्णपदक जिंकणे हे मेसीचे सर्वात मोठे यश ठरले.

ग्रेटेस्ट- (वर्ल्डकप+कोपा) = लियोनेल मेसी
मेसीच्याटीकाकारांच्या मते त्याच्या नावे वर्ल्डकप आणि कोपा अमेरिकेचा किताब असता तर तो सर्वकालीन महान खेळाडू म्हणून ओळखला गेला असता. स्किलच्या हिशेबाने त्याची तुलना नेहमी ब्राझीलचे दिग्गज पेले आणि त्याच्या देशाचे दिएगो मॅरेडोनाशी केली जाते. मात्र, अर्जेंटिनासाठी एकही किताब जिंकू शकल्याने तो ग्रेटेस्ट फुटबॉलपटूंच्या शर्यतीत या दोन दिग्गजांपासून मागे राहिला. पेलेच्या उपस्थितीत ब्राझीलने तीन वेळा वर्ल्डकप जिंकला. तर मॅरेडोनाने १९८६ मध्ये अर्जेंटिनाला वर्ल्ड चॅम्पियन बनवले होते.
अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीने सोमवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. कोपा अमेरिका स्पर्धेच्या फायनलमध्ये चिलीकडून पेनॉल्टी शूटआऊटमध्ये पराभवाने तो निराश होता. यापूर्वी त्याने संघाला दोनदा कोपा अमेरिका एकदा वर्ल्डकप फायनलपर्यंत नेले होते, पण हाती पराभवच आला. तीन दिवसांपूर्वी ऑलिम्पिकसाठी घोषित राष्ट्रीय संघात त्यांना स्थान मिळाले नव्हते. परंतु तो अापला क्लब बार्सिलोनासाठी खेळतच राहील.
-सर्वाधिक पाच वेळा फिफाचा सर्वोत्तम फुटबॉलरचा बॅलन डी पुरस्कार जिंकला अाहे.
-एका वर्षात सर्वाधिक ९१ गोल करण्याचा गिनीज विश्वविक्रम केला अाहे.
-सलग सत्रांत ४० हून जास्त सत्रांत ६० पेक्षा जास्त क्लब गोल करणारा एकमेव खेळाडू.
-अर्जेंटिनाकडून सर्वाधिक ५५ गोल केले. देशातील सर्वाधिक चारदा हॅट‌्ट्रिक केली.

कोपा कपमधील पराभवाचा फटका
- अर्जेंटिनाचे कोच गेर्राडो मार्टिनो यांनी 29 वर्षांचा स्टार खेळाडू मेसीला ऑलिम्पिक टीममध्ये स्थान न देण्याचे कारण सांगितलेले नाही.
- अशी माहिती आहे ,की कोपा कपच्या फायनलमध्ये चिली विरोधात अर्जेंटिनाचा झालेला पराभव हे मेसीच्या टीममधील सुट्टीचे एक कारण असू शकते.
- फायनलमध्ये चिलीने 4-2 असा विजय मिळविला होता. चिलीने मॅचमध्ये एकही गोल केला नाही मात्र पॅनल्टी गोलने मॅच जिंकली होती.
- तर, दुसरीकडे मेसीने पॅनल्टी गोलची संधी हुकवली होती. अर्जेटिनाचा हा मोठ्या स्पर्धेतील सलग 7 वा पराभव होता.
मेसीच्या नावावर अनेक विक्रम
> ऑलिम्पिकसाठीच्या टीममधून मेसीला दूर ठेवणे सर्वांसाठीच धक्का होता.
> कोपा अमेरिका कपमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असलेला मेसी फक्त फायनल मॅचमध्ये कमाल दाखवू शकला नाही.
> काही दिवसांपूर्वीच मेसीने आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात अर्जेंटिनासाठी 55 वा गोल केला होता. या गोल बरोबरच तो सर्वाधिक गोल करणारा प्लेयर झाला होता.
> अर्जेंटिना 2004 आणि 2008 मध्ये ऑलिम्पिक चॅम्पियन राहिले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मेसीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर चाहत्यांच्या कशा राहिल्या प्रतिक्रिया... या दिग्गजांनीसुद्धा महत्त्वाच्या क्षणी पेनल्टी गमावली... त्यासोबतच मेसीचा गोल करु शकला नाही तो व्हिडिओ... आणि मेस्सीेचे विक्रम...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...