आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Arsenal Defender Hector Bellerin Goes On A Dinner Date With Bollywood Actress Esha Gupta

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष : फुटबॉलपटू बेलेरिनची अभिनेत्री ईशासाेबत डेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डिनर डेटला जाताना ईशा आणि स्पॅनिश फुटबॉलपटू हेक्टर बेलेरिन. - Divya Marathi
डिनर डेटला जाताना ईशा आणि स्पॅनिश फुटबॉलपटू हेक्टर बेलेरिन.
लंडन - स्पॅनिश फुटबॉलपटू हेक्टर बेलेरिनचे जीवन गेल्या काही दिवसांपासून रोमांचक झाले आहे. आधी तर त्याची टीम आर्सेनलने इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये चेल्सियाला ३-० ने हरवले. शिवाय तो नुकताच भारतीय अभिनेत्री ईशा गुप्तासोबत झळकला. ईशा इंग्लिश फुटबॉल क्लब आर्सेनलची चाहती आहे. याआधी ती आर्सेनल-चेल्िसया सामन्याच्या वेळी बेलेरिनला चिअर करताना सुद्धा दिसली होती.
यामुळे दोघांची मैत्री सर्वांच्या नजरेत आली आहे. भारताच्या इशानेही आर्सेनल टीमच्या किटसोबत आपले बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दोघे काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये डिनर डेटवर सुद्धा दिसले. दोघे एकमेकांसमवेत खूप आनंदी दिसत होते. डिनरच्या आधी ईशा जेव्हा बेलेरिनची वाट बघत होती, तेव्हा ती खूप निराश आणि नाराज दिसत हाेती. मात्र, बेलेरिन आला आणि ितला भेटताच तिची निराशा दूर पळाली. ती खूप खुश झाली. दोघांनी एका व्हेज रेस्ट्राॅरंटमध्ये डिनरही घेतले. दोघे रेस्ट्राॅरंटमध्ये जवळपास तीन तास सोबत होते. ईशा गुप्ता-बेलेरिन दोघेही खूप आनंदी दिसत होते आणि हसत हसत बोलत होते.
याआधी ईशा आर्सेनलचा डिफेंडर बेलेरिनसोबत त्याच्या मर्सेडिज बेंजमध्ये लाँग ड्राइव्हवर गेली होती. यामुळे बेलेरिन आणि ईशा एकमेकांना डेट करत असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. दोघांची पहिली भेट लंडन डर्बीमध्ये झाली होती. तेथे दोघांची मैत्री झाली. माजी मिस इंडिया इंडरनॅशनल ईशाने राज-३ डी, रुस्तम सारख्या चित्रपटात केला अभिनय अधिक प्रभावी ठरला अाहे.
बातम्या आणखी आहेत...