आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अॅशेस सिरीज आजपासून: 5 पैकी 4 ट्रॉफी इंग्लंडकडे; 31 वर्षांत ब्रिस्बेनमध्ये विजय मिळवता आला नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिस्बेन- इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळवला जाईल. गेल्या पाचपैकी चार अॅशेस सिरीज इंग्लंडने जिंकल्या आहेत. मात्र, त्यांना या मैदानावर ३१ वर्षांत एकही विजय मिळवता आला नाही. 


अव्वल फलंदाजांकडे नेतृत्व
ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि इंग्लंडचा ज्यो रूट पहिल्यांदा अॅशेसमध्ये संघाचे नेतृत्व करत आहेत. स्मिथ आयसीसी क्रमवारीत पहिल्या आणि रूट दुसऱ्या स्थानावर आहे.  


जगातील सर्वात छोटी ट्रॉफी
१८८२ मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा इंग्लंडला त्यांच्या धरतीवर पराभूत केले. लंडनच्या एका वृत्तपत्राने लिहिले की, इंग्लिश क्रिकेट मरण पावले. आता त्याचे अवशेष अॅशेस ऑस्ट्रेलियात नेले जातील. त्या वर्षी इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवले. काही महिलांनी लाकडी चंेडू जाळून त्याची राख ट्रॉफीत भरली. ती ट्रॉफी इंग्लिश कर्णधाराला देत अॅशेस परत न्या म्हटले. तेव्हापासून ही मालिका सुरू झाली. 


दोन्ही संघांतील खेळाडू
ऑस्ट्रेलिया :
वॉर्नर, कॅमरन बेनक्रॉफ्ट, ख्वाजा स्मिथ कर्णधार, हँड्सकोम्ब, मार्श, टिम पॅन, मिशेल स्टार्क, कमिन्स, लायन, हेजलवूड.
इंग्लंड : कुक, मार्क स्टोनमेन, जेम्स विन्स, ज्यो रूट (कर्णधार), डेव्हिड मालन, अली, बेअरस्टो, क्रिस वोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, अँडरसन, जॅक बॉल.

बातम्या आणखी आहेत...