आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वाला-अश्विनीने पटकावले कॅनडा अाेपन ग्रांप्रि महिला दुहेरीचे विजेतेपद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलागरी - राष्ट्रकुल स्पर्धेतील राैप्यपदक विजेत्या ज्वाला गुट्टा अाणि अश्विनी पाेनप्पा कॅनडा अाेपन ग्रँडप्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरीत चॅम्पियन ठरल्या. ज्वाला अाणि अश्विनीने अवघ्या ३५ मिनिटांत शानदार विजयासह ५० हजार डाॅलरच्या बक्षिसाचा मान मिळवला.

भारताची अाघाडीची ज्वाला गुट्टा अाणि अश्विनी पाेनप्पाने अंतिम सामन्यात हाॅलंडच्या इफेजे मुस्केन्स अाणि सेलेना पिईकचा २१-१९, २१-१६ असा पराभव केला. त्यांनी ३५ मिनिटांत बाजी मारली. अव्वल मानांकित इफेजे मुस्केन्स अाणि सेलेना पिईकला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

३५ मिनिटांमध्ये ५० हजार डाॅलर
तिसऱ्या मानांकित भारताच्या ज्वाला अाणि अश्विनीने ३५ मिनिटांमध्ये महिला दुहेरीचे फायनल जिंकून अजिंक्यपदासह ५० हजार डाॅलरच्या बक्षिसाची कमाई केली.

तीन वर्षांनंतर मिळाला किताब
ज्वाला अाणि अश्विनी या जाेडीने तब्बल तीन वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर महिला दुहेरीचा किताब पटकावला. यापूर्वी २०१२ मध्ये त्यांनी यश संपादन केले हाेते. लंडन अाॅलिम्पिकपूर्वी या दाेन्ही खेळाडूंमध्ये वितुष्ट निर्माण झाले हाेते. मात्र, त्यानंतर या दाेघींनी एकत्र खेळण्याचा निर्णय घेतला.

अात्मविश्वास वाढला : अश्विनी पोनप्पा
कॅनडा अाेपनमधील अजिंक्यपदाने अाता अामचा अात्मविश्वास द्विगुणित झाला अाहे. अाता हीच लय अागामी वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्येही कायम ठेवण्याचा अामचा प्रयत्न असेल, त्यासाठी अाम्ही अधिक प्रयत्नशील असू, अशी प्रतिक्रिया विजेत्या अश्विनीने दिली. येत्या अाॅगस्टमध्ये बॅडमिंटनची वर्ल्ड चॅम्पियनशिप हाेणार अाहे. या स्पर्धेत अश्विनी ज्वालासोबत खेळणार आहे.
बातम्या आणखी आहेत...