आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाशिया चषकात अाज भारत-चीन समाेरासमाेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुअानतान- सलगच्या दाेन विजयांनी अात्मविश्वास द्विगुणित झालेला भारतीय युवा हाॅकी संघ अाता मंगळवारी हॅट्ट्रिक नाेंदवण्यासाठी सज्ज झाला अाहे. अाठव्या ज्युनियर अाशिया चषक हाॅकी स्पर्धेत भारताचा सामना चीनशी हाेणार अाहे. भारताने अ गटात सलग दाेन विजय मिळवून स्पर्धेत अापला दबदबा निर्माण केला अाहे. त्यामुळे अाता हरजितच्या नेतृत्वात तिसरा सामना जिंकण्याचा भारतीय युवा टीमचा प्रयत्न असेल.

अ गटाच्या गुणतालिकेत भारतीय संघ सहा गुणांसह अव्वल स्थानावर अाहे. भारताने अातापर्यंत जपान व मलेशियाविरुद्ध विजय मिळवले अाहेत. अाता चीनविरुद्ध विजयाने भारताला स्पर्धेच्या अंतिम अाठमधील प्रवेश निश्चित करता येईल. ‘विजय मिळवून भारत क्षमता सिद्ध करेल,’असे काेच हरेंद्र म्हणाले.