आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहुण्या द. कोरियाविरुद्ध यजमान भारताचे पारडे जड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - भारत आणि पाहुणा दक्षिण कोरिया यांच्यात आशिया ओशियाना ग्रुप-१ डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या सामन्यांना चंदिगड क्लबच्या ग्रास कोर्टवर शुक्रवारपासून सुरू होत आहे. दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस आणि रोहन बोपन्ना यांच्यावर भारताची मदार असेल. एकेरीतील भारताचे खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असलेल्या भारताच्या दुहेरीतील खेळाडूंचे आपसांतील ताळमेळही अद्याप मजबूत झालेले नाही, असे असताना ही शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या द. कोरियाविरुद्ध टेनिस लढतीत भारत विजयाचा प्रबळ दावेदार आहे.

एकेरीत खेळणारा रामकुमार रामनाथन आणि साकेत मिनानी यांच्यावर भारताचा विजय अवलंबून असेल. २१ वर्षीय रामकुमार पहिल्यांदा डेव्हिस चषकात खेळणार आहे. भारताचे एकेरीचे प्रमुख खेळाडू युकी भांबरी आणि सोमदेव देववर्मन जखमी आहेत. चेन्नईचा रामकुमारची खेळातील ऊर्जा, जोश, वेगवान स्ट्रोक्स यांना तोड नाही. त्याचे फोरहँड अत्यंत प्रभावी असतात. मात्र, सलग चांगली कामगिरी करू न शकल्याने तो पुढे जाऊ शकला नाही.
कोरियाकडे दिग्गज खेळाडू नाही चंदिगड येथे भारताचा सामना करण्यासाठी आलेल्या द. कोरियाकडे एकही दिग्गज खेळाडू नाही. ग्रास कोर्टवर द. कोरियाचे खेळाडू कमीच खेळतात. यामुळे त्यांनी ८ ते १२ नॅशनल रॅकिंगच्या खेळाडूंना येथे खेळण्यास पाठवले आहे. ४५२ व्या क्रमांकावर असलेला १९ वर्षीय सियोंग चान होंग कोरियन आव्हानाचे नेतृत्व करेल. संघातील तील अव्वल खेळाडू हेओन चुंग (१०७), ली डकही (२०१) आणि सून वू कोन (४३३) यांच्या अनुपस्थितीत योंग क्यूं लिम (६२२), युनसियोंग चुंग (६४२) आणि योंग चुंग (६७६) यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. या चारपैकी एका खेळाडूने दोन तर इतर एकाने १५ डेव्हिस चषकाचे सामने खेळले आहेत. दोघेजण डेव्हिस चषकात पदार्पण करतील. या आधारावर कोरियन डेव्हिस चषक संघावर भारताची बाजू वरचढ दिसते.
पुढे वाचा, राज्यपालांनी काढले ड्रॉ., आम्हाला लवकर आघाडी घ्यावी लागेल : लिएंडर पेस
बातम्या आणखी आहेत...